खराब रस्त्यांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. खराब रस्त्यामुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.या रस्त्यांच्या अवस्थेला अधिकारी आणि प्रशासनाच्या बेजाबाबदार कामाचा निषेध करण्यासाठी याआधी अनेकदा स्थानिकांनी अनोखे मार्ग अवलंबले आहेत. अशाच एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. कर्नाटकातील उडुपी येथे खड्डेच खड्डे असलेल्या रस्त्यावर ‘यमराज’ आणि ‘चित्रगुप्त’ या अवतरले आहे. ‘यमराज’ आणि ‘चित्रगुप्त’ वेशभूषेतील व्यक्तींचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “देव तारी त्याला कोण मारी!” रस्त्यावर चालत्या दुचाकीवर पडली झाडाची फांदी, अपघाताचा Live Video Viral

School teacher dance on marathi song Mi Haay Koli song with student school video goes viral on social media
“मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी..”जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai: Worker Attempts Suicide Twice in Vikhroli, Saved by Safety Nets After Jumping From 13th Floor video goes viral
मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी…VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
almost falls off cliff
उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral
Video of a grandmother and grandfather dancing on marathi song halagi tune is currently going viral
नाद खुळा! गावच्या मिरवणुकीत डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
1.5-Year-Old's child Climb Up Tikona Fort!
Video : असे संस्कार प्रत्येक आईवडिलांनी करावे! दीड वर्षाच्या चिमुकल्याने सैर केला तिकोना किल्ला! व्हिडीओ एकदा पाहाच
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर

खड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यावर उतरले यमराज आणि चित्रगुप्त


व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, खड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यावर चक्क यमराज आणि चित्रगुप्त अवतरले आहेत आणि रस्त्यांची पाहणी करत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ‘भूताच्या वेशभुषेतील लोक लांब उडी स्पर्धेत भाग घेताना दिसत आहे तर ‘यमराजा’ आणि ‘चित्रगुप्त’ यांच्या वेशभुषेतील लोक भुतांनी किती लांब उडी मारली हे मोजताना दिसत. मजेशीर पद्धतीने प्रशासनाच्या कामाचा निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरणे शक्य होत नाही.

हेही वाचा – ९ थर लावणार इतक्यात…; जय जवान पथकाचे विश्वविक्रमाचे स्वप्न यंदाही अपूर्णचं, Video मध्ये पाहा नेमकं चुकलं काय?

नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

X हँडल @letsmakebetterplace ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. “यमराज आणि चित्रगुप्त आदि उडुपी मधील रस्त्यांची स्थिती पाहत आहे !!” असे कॅप्शनमध्ये व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे. ४८,००० हून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहे. तसेच अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने लिहिले, “फ्रिबीज सरकारकडे पायाभूत सुविधा पाहण्यासाठी पैसे नाहीत. राज्याची स्थिती जिथे INC सरकार आहे. दुसऱ्याने लिहिले की “खूप चांगला प्रयत्न. पण निवडून आलेले लोक दुर्लक्ष करण्यात व्यस्त असल्याने उपयोग नाही.”

“कर्नाटकात भ्रष्टाचार वाढला आहे. हे भ्रष्ट लोक आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोणत्याही पैशाशिवाय सर्व जनतेला मोफत सेवा द्यावी,”
अशी प्रतिक्रिया तिसऱ्याने दिली.

हेही वाचा – ११० वर्ष जुनी परंपरा! ‘या’ गावात उडी मारून डोक्याने फोडली जाते दहीहंडी, Video होतोय Viral

गेल्या महिन्यात, बेंगळुरूच्या जयनगरमधील रहिवाशांनी रस्त्याच्या खराब स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी ‘खड्ड्याची पूजा’ केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पावसाच्या पाण्याने भरलेल्या एका मोठ्या खड्ड्याजवळ महिला आणि पुरुष पूजा करताना दिसत आहेत. रहिवाशांनीही पुष्प अर्पण केले. TOI मधील वृत्तानुसार, रहिवाशांनी मिरवणुकीला “गुंडी पूजन” असे संबोधले.

Story img Loader