सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजकाल तरुण-तरुणी काहीही करायला तयार होतात. कोणी सार्वजनिक ठिकाणी डान्स करताना दिसते तर कोणी जीव धोक्यात घालून स्टंट करताना दिसते. सध्या अशाच एका तरुणाचा धोकादायक स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंटबाजी केल्याच्या अनेक घटना यापूर्वी नोंदवण्यात आल्या आहेत. प्रसिद्धीसाठी पुशअप्स करतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण भररस्त्यात १० मीटर उंच साईनबोर्डला लटकून पुश अप्स करताना कधीही पाहिले नसेल? पण उत्तरप्रदेशात प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण ज्या साइनबोर्डला लटक आहे त्यावर NH 931, मुन्शीगंज 06 (डावा बाण), अमेठी 3.5 (उजवा बाण)” असे लिहिले आहे. व्हायरल क्लिपमध्ये तरुण लोखंडी स्ट्रक्चरला धरून पुल-अप मारताना दिसत आहे.. आणखी एक तरुण खांबाच्यावर बसलेला दिसतो. व्हिडिओ शेअर करताना, X हँडल @AmethiliveCom ने लिहिले की, “एक तरुण किलोमीटरच्या साइनबोर्डवर पुल-अप करताना दिसला, त्याचा जीव धोक्यात घालून रस्त्याच्या १० मीटर वर असलेल्या बोर्डवर पुल-अप करत आहे. हा व्हिडिओ एकाSachin नावाचया इंस्टाग्राम आयडीवरून पोस्टवर करण्यात आला आहे.

हेही वाचा –पुणेरी आजोबांचा नादखुळा! स्टेजवर चढून हवेत काठी घेऊन बिनधास्तपणे नाचले आजोबा! Viral Video एकदा बघाच

येथे पाहा Viral Video

अमेठी पोलिसांनी तत्काळ व्हिडिओला प्रतिसाद देत या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले. “हे प्रकरण अमेठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. व्हायरल व्हिडिओची चौकशी केली जात आहे, आणि तपासणीनंतर, स्टंट करणाऱ्यांवर नियमानुसार आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल, ”असे कॅप्शन अमेठी पोलिसांच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट शेअर करताना लिहिले आहे.

हेही वाचा –मॅगी स्मिथ, सुदेश लेहरी, रणवीर अलाहाबादिया गुगलवर सर्वाधित चर्चेत! मनोरंजन क्षेत्रातील आठवडाभर Google Trendsमध्ये असलेले टॉप ५ विषय

जुलैमध्ये, मुंबईतील एका तरुणाने-ज्याने आपल्या ट्रेन स्टंटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. त्याचा एक स्टंट करताना चुक झाल्याने त्याला एक हात आणि पाय गमवावा लागला. वृत्तानुसार, हा “मुलगा रेल्वे संरक्षण दलाला (RPF) गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता.”

मार्चमध्ये दिल्ली पोलिसांनी नजफगढ-राजौरी गार्डनजवळ त्याच्या एसयूव्हीसह प्राणघातक स्टंट करताना दिसलेल्या एका व्यक्तीला पकडले. ANI नुसार, “पोलिसांच्या वाहनाने आरोपीचा पाठलाग केला आणि शेवटी राजौरी गार्डन पोलिस स्टेशनमध्ये एसयूव्ही ताब्यात घेतली.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch youth does pull ups holding highway signboard 10m above road in uttar pradesh police react to viral video snk