सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी कधी कोण काय करेल याचा काही नेम नाही. लोकांचे लक्ष स्वत:कडे वेधण्यासाठी लोक असे काही करतात ज्याची अपेक्षाही कधी कोणी केली नसेल. सध्या अशाच एका प्रसिद्ध युट्यबरचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. हटके वस्तूंमुळे नेहमी चर्चेत असलेल्या अमेरिकन युट्युबर IShowSpeedने आता चक्क एक रोबो डॉग खरेदी केला आहे. चायनामधून खरेदी केलेला रोबो डॉग तब्बल १,००,००० डॉलर म्हणजेच साधारण, ८४ लाख रुपयांचा आहे. पण जेव्हा या रोबो डॉग त्याने भुंकण्याची आज्ञा दिल्यानंतर जे घडले ते पाहून युट्युबर IShowSpeed थक्क झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आग ओकणारा रोबो डॉग

युट्युबरने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. हा व्हिडिओ तब्बल ४५ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओमध्ये हाय-टेक रोबो डॉगची चाचणी घेत आहे. सुरुवातीला हा रोबो डॉग युट्युबरने दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करत होता जसे की त्याला बस म्हटल्यास तो बसत होता. नेहमी मजा मस्ती करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या युट्युबरने उलटया उड्या मारल्या आणि त्याचे नक्कल करत रोबो डॉगनेही उडी मारली. पण सर्व खेळ तेव्हा पलटला जेव्हा युट्युबरने रोबो डॉगला भुंकण्याची आज्ञा दिली. भुंकण्याऐवजी जेव्हा रोबो डॉग जेव्हा आग ओकू लागला. अचानक आलेल्या आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी युट्युबरला थेट स्विमिंगपूलमध्ये उडी मारावी लागली.

हेही वाचा – “नातं इथपर्यंत पोहचलं पाहिजे!” थरथरत्या हातांनी आजोबांनी आजीच्या गळ्यात घातली वरमाला”, Viral Video एकदा बघाच

येथे व्हिडिओ पहा:

सविस्तर व्हिडिओ शेअर करत युट्युबरने नक्की काय घडले ते स्पष्ट केले. यात युट्युबरने IShowSpeed ​​उत्सुकतेने रोबोट डॉग कसा कार्य करतो हे दाखवले आहे.

हेही वाचा –“माय-बापाचे उपकार आपण फेडू शकत नाही!” आई वडीलांना पाहताच पुण्याचा पोलिस झाला नतमस्तक, Viral Video बघाच

रोबोट डॉग सुरुवातीला आज्ञांना प्रतिसाद देत होता नंतर अचानक तो आग ओकू लागला जे पाहून YouTuberला धक्का बसला. पण आपल्या मित्राच्या मदतीने,तो अखेरीस हाय-टेक मशीन रोबो डॉग कसे चालवायचे हे शोधण्यात यशस्वी झाला.

अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसला नाही. काहींनी हा “डॉग रोबो” नाही “ड्रॅगन रोबो” असल्याची टीका केली.

एकाने सांगितले, “हे थोडे धोकादायक वाटते, हा कुत्रा आगीच्या ज्वाळांनी स्वत:च्या मालकाला हानी पोहचवतो आहे,” तर दुसरा म्हणाला “तो कुत्रा नेमका कशासाठी आहे? जसे की आग का ओकत आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch youtuber ishowspeeds new robot dog worth rs 84 lakh shoots flames at him snk