पावसाळा सुरु झाला की उंच उंच डोंगरावरून धबधबे आणि कोसळणाऱ्या पावसाच्या धारा अंगावर घेण्यासाठी सगळ्यांची रेलचेल सुरु होते. दरम्यान एका धबधब्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे. एका तरुणानं उंच टोकावर जाऊन बोटीनं पाण्यात जीवघेणा खेळ केला. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, धबधब्याच्या ठिकाणी वेगात असलेल्या पाण्यासोबत राफ्टिंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. उंच असलेल्या टेकडीवरुन खाली पाणी पडतं आहे. तिथं कोणलाही भीती वाटेल, परंतु राफ्टिंग करणाऱ्या लोकांना अजिबात भीती नसल्याचं त्या व्हिडीओतून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे ती व्यक्ती पाण्याच्या वेगाने खाली पाण्यात पडली आहे. काहीवेळ ती व्यक्ती गायब झाली असं वाटतंय, परंतु काही वेळाने ती व्यक्ती धबधब्याच्या खालच्या बाजूला दिसून येत आहे. या व्यक्तीचा कमबॅक पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडीओ “शौर्य आणि कौशल्याचा मिलाप आहे.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – महिलेने दिला एलियनला जन्म? बाळाचा चेहरा पाहून डॉक्टरही चक्रावले, VIDEO होतोय व्हायरल

डोंगराळ भागात फिरणे, ट्रेकिंग करणे आणि वॉटर अ‍ॅडव्हेंचर करण्याची हौस खूप लोकांना असते. तुम्ही नेहमी पाहिले असेल की लोक गृपमध्ये एकत्र येऊ रिव्हर राफ्टींग किंवा ट्रेकिंग करण्यासाठी जातात. रिव्हर राफ्टिंगची हौस असलेल्या लोकांना हे देखील माहित असते की हे साहस त्यांच्या जीवावर बेतू शकते. पण तरीही लोक रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी मागे हटत नाही. सोशल मीडियावर रिव्हर राफ्टिंगचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे