Viral video: पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात. या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात. काही पर्यटक तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात. पण, असे साहस काही वेळा पर्यटकांच्या चांगलेच जीवावर बेतते. अशा घटना पाहता, वारंवार सांगितले जाते की, पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता, धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. अशाच प्रकारे काही पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत होते. परंतु, अचानक तेथील पाण्याची पातळी वाढली आणि होत्याचे नव्हते होऊन बसले. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून पाण्याशी खेळणे कसे जीवावर बेतू शकते याची कल्पना येईल. पर्यटकांचा हा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओत काही पर्यटक पाण्यात आनंद घेताना दिसत आहेत. यावेळी अचानक पाण्याचा मोठा झोत येतो आणि काही पर्यटकांना प्रवाहाबरोबर घेऊन जातो. हे सर्व काही इतक्या अचानक घडलेय की, लोकांना काही समजलेच नाही. या थरकाप उडवणाऱ्या घटनेत लोक आपला जीव वाचवण्यासाठी कसे आरडाओरडा करतायत हे दिसतेय.

youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
a young guy Caught Sleeping in Theater
चित्रपट संपला, लोक घरी परत जात होते, पण तरुण मात्र गाढ झोपलेला; थिएटरमधील VIDEO होतोय व्हायरल
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
Shocking video truck accident video instead of helping him some people started lotting his mobile money
माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका खडकावर काही प्रमाणात पाणी असताना मोठ्या संख्येने लोक आनंद लुटताना दिसत आहे. याच दरम्यान पाण्याचा प्रवाह इतका वाढतो की लोक सैरावैरा पळू लागतात. मात्र पुढे गेलेले लोक पाण्याच्या प्रवाहामुळे अडकून राहतात. पाण्याचा प्रवाह इतका वाढतो की ४ ते ५ जण मधोमधो अडकून राहतात. पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर नदीच्या काठावर काही लोक त्यांना बाहेर या बाहेर या सांगत आहेत मात्र पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढलेला दिसत आहे. दरम्यान अचानक त्यांचा तोल जातो आणि सगळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून जातात. . ही घटना इतकी अचानक घडली की, पाण्यातून बाहेर पडण्यापूर्वीच पाण्याच्या प्रवाहाने भीषण रूप धारण केले आणि त्यामुळे बचावासाठी पुढे आलेले लोकही घाबरले. ही घटना खूप मन हेलावून टाकणारी आहे.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C7n1ANVRUlA/?igsh=aDFydW96aDU2bmM5

हेही वाचा >> VIDEO: अमेरिकेतही सप्रिया सुळेंच्या लोकप्रियतेचा डंका; टाईम्स स्क्वेअरवर झळकला बाप-लेकीचा फोटो

या भीषण घटनेचा व्हिडीओ queenie_sri नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय, “अनेकदा इशारा देऊनही लोक पाण्याखाली जातात आणि आंघोळ करतात. त्याचाच परिणाम म्हणजे हा अपघात आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तेव्हा निसर्गाशी खेळ करू नये.”

Story img Loader