सुट्ट्यांमुळे अनेकांची रिसॉर्टस किंवा वॉटर पार्कमध्ये मौज करण्याला पसंती असते. पण हीच मजा मस्ती कधी कधी जीवावर पण बेतू शकते. एका रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहण्याआधी केलेली मस्ती दोन तरुणांच्या चांगलीच अंगलट आली आहे. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हल्ली तरुण सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीही करु शकतात हे आपण मागे व्हायरल झालेल्या अनेक व्हिडीओमधून पाहिलं आहे. मात्र फेमस होण्याच्या नादात आपण आपला जीव धोक्यात घालतोय याचा तरुणाई अजिबत विचार करत नाही आणि अपघाताला बळी पडतात. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
रिसॉर्टमध्ये दोन तरुणांची फसलेली स्टंटबाजी पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण रिसॉर्टमध्ये स्विमींग पूलच्या बाहेर उभे आहे. त्यातील एक समोरच्या मुलाच्या खांद्यावर चढतो आणि खांद्यावरुन पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्नात असतानाच अचानक पाय घसरतो. यानंतरच दृश्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण, तो तरुण थेट स्विमींग पूलच्या कड्यावर पडतो. तो इतक्या चुकीच्या पद्धतीने कंबरेवर पडतो की व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेलच की त्याला किती गंभीर दुखापत झाली असेल. हल्ली स्विंमिंग पूलमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, या गर्दीत एक धक्कादायक घटना घडत आहेत.
पाहा व्हिडीओ
वॉटर पार्कला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण अपघात कधीही होऊ शकतो. यासाठी कुणी आधीपासून तयार नसतो. जेव्हा व्यक्तीला अपेक्षाही नसते तेव्हा विचारही केला नसेल, अशा घटना घडतात. वॉटरपार्कमध्ये आपण मज्जा मस्ती एन्जॉय करण्यासाठी जात असतो, पण हीच मजा कधीकधी आपल्या जीवावर बेतू शकते. आनंद लुटण्याच्या नादात अनेकांसोबत विचित्र घटना घडतानाही समोर येत आहे. त्यामुळे स्विमिंग पूलच्या पाण्यात मजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून यावर भरपूर कमेंट येत आहेत.