Water poisoning : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक अशा गोष्टी करतात ज्यामुळे नंतर त्यांना फक्त पश्चाताप होतो. असेच काहीसी प्रकरण सध्या चर्चेमध्ये आहे. एका टिकटॉक वापरणाऱ्या महिलेने ऑनलाईन फिटनेस चॅलेंजच्या नादात इतके पाणी प्यायली की तिला थेट हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले आहे. हॉस्पिटलमध्ये भरती केल्याची माहिती महिलेने सोशल मीडियावर आपला फोटो पोस्ट करून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉक इन्फ्ल्यूएन्सर मिशेल फेअरबर्न (Michelle Fairburn) ही कॅनडामध्ये राहते. तिने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले ७५ हार्ड (75 Hard) चॅलेंज स्विकारले. या चॅलेंमध्ये ७५ दिवसांचे रुटीन फॉलो करायचे होतो ज्यामध्ये सकाळी लवकर उठून रोज व्यायाम करणे, बाहेरचे काही खायचे नाही, दारू पिणे बंद करायचे, रोज १० मिनिटे एक पुस्तक वाचायचे. हे चॅलेंज स्विकारल्यानंतर ७५ दिवस ४ लिटर पाणी प्यायचे आणि रोज आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे.

भूक लागणे झाले बंद
मिशेल सतत १२ दिवस ४ लिटर पाणी पित होती. बारव्या दिवशी तिने आपला एक व्हिडीओ शेअर करत सांगितले की,”जास्त पाणी प्यायल्यामुळे तिची तब्येत बिघडली. व्हिडीओमध्ये मिशलने सांगितले की, ”मला अजिबात बरं वाटत नाही. रात्री झोपल्यानंतर कित्येकदा माझी झोप मोड होते मला बाथरुमला जावे लागते. मला भुक लागणे कमी झाले आहे आणि मला अशक्तपणा जाणवतो आहे. दिवसातील कित्येक वेळ मला टॉयलेटमध्ये घालवावा लागतो आहे.”

हेही वाचा – टोमॅटोमुळे बदलले नशीब, शेतकऱ्याने ४५ दिवसात कमावले ४ कोटी रुपये अन् १.५ कोटींचे कर्जही फेडले

….तर जीव गेला असता
मिशेलने सांगितले की, ”तिची तब्येत बिघडल्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली. त्यांच्या सल्ल्यानुसार अनेक टेस्ट केल्या. टेस्ट रिपोर्ट समोर आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, मला सोडियम डेफिशिअन्सी (sodium deficiency) नावाचा आजार झाला आहे. सतत पाणी प्यायल्याने असे झाले आहे. डॉक्टरने मला काही जिवस रोज अर्धा लिटर पेक्षा कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, सोडियम डेफिशिअन्सी किंवा हायफोनेट्रेमिया वेळेत उपाय केला नसता तर जीवही गेला असता.

हॉस्पिटलमध्ये व्हावे लागले भरती
त्यांनी पुढे सांगितले की, ”सोडियम डेफिशिअन्सीने पिडीत असल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. माझ्या शरीरात सोडियमची कमतरता होऊ लागली जी आता औषधे खाऊन वाढवली जात आहे. मला विश्वास बसत नाही की, असेही होऊ शकते की मी ७५ हार्ड चॅलेंज सोडणार नाही. पण डॉक्टरांचा सल्ल्यानुसार आता अर्धा लिटरपेक्षा जास्त कमी पिणार आहे.”

हेही वाचा – ‘हा कुत्रा नव्हे माणूस!’ कुत्र्यासारखे दिसण्यासाठी व्यक्तीने खर्च केले १२ लाख रुपये

७५ हार्डची सुरुवात कशी झाली?

हे फिटनेस चॅलेंज २०१९ मध्ये अँडी फ्रिसेला, पॉडकास्टर आणि सप्लिमेंट कंपनीचे सीईओ यांनी सुरू केले होते. मानवी मनासाठी त्यांनी त्याला ‘आयर्नमॅन’ म्हटले आहे. मात्र, हा फिटनेस कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही त्यांनी सांगितले आहे. डॉक्टरांनी शिफारस न केल्यास ते सुरू करू नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water poisoning woman hospitalised after drinking 4 litres of water for 12 days snk
Show comments