Mumbai Pune Express Way : पुणे-मुंबई महामार्गावर रविवारी दुपारी सुमारे पंधरा मिनिटांच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली ज्यामुळे सुमारे अर्धातास वाहतूक कोंडी झाली होती. अमृतांजन पॉइंट आणि बोर घाट बोगद्यादरम्यानच्या महामार्गावर गुडघाभर पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकीचा वेग मंदावला होता. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुडघाभर पाण्यातून जाणाऱ्या वाहनांचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान वाहतूक कोंडीमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर परिणाम झाला.
सखल भागात पाणी साचले असून त्यामुळे वाहनांना पाण्यातून जाणे अवघड झाले होते. जलमय रस्त्यावरून वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.याशिवाय मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेला चिंचवली-बोरघर मार्ग सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेला असून, नदीला पूर आला आहे. यामुळे चिंचवली गाव खेड तालुक्यातील इतर गावांपासून पूर्णपणे तुटले आहे. खेड तालुका प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
एक्सवर @PuneCityLife नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळील बोरघाटाजवळ ही सध्याची स्थिती आहे. गुडघाभर पाण्यातून वाहने मार्गक्रमण करत आहेत. गेल्या २४ तासांत लोणावळ्यात २४० मिमी पाऊस झाला.” व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – पुणेकरांनी हद्दच केली राव! “गुपचूप बस तिथं” म्हणत थेट बिबट्यालाच दरडावले, महावितरण कार्यालयातील Video Viral
व्हायरल व्हिडीओ पाहून संतापले नागरिक
व्हायरल व्हिडीओ पाहून संतापलेल्या नागरिकांनी कमेंट देखील केल्या आहेत. ”काय फालतूपणा आहे, ७० किमी लांबीच्या ३४० रुपयांचा हा सर्वात महागडा टोल आहे.” दुसरा म्हणाला, महामार्गावर ड्रेनेज नाही? मला वाटले लोणावळा घाटातील पाऊस लक्षात घेऊन एक्सप्रेस वे तयार केला आहे.”
तिसरा म्हणाला, मुंबई पुणे एक्स्पेस वेवर पाणी साचल्याचे यापूर्वी कधीही ऐकले नव्हते हा परिसर सुस्थितीत आणि तुंबलेल्या नाल्यांपासून मुक्त असावा असे मानले जाते कारण ते बाहेरील बाजूस आहे आणि फेरीवाल्यांवर निर्बंध आहेत. पण, प्रकल्पातील बांधकाम कचऱ्यामुळे नाले तुंबले असण्याची शक्यता आहे. अशावेळी अधिकाऱ्यांनी या समस्येचा अंदाज घेऊन नाले सफाईसाठी पावले उचलायला हवी होती.”
हेही वाचा – Video : नेपाळमध्ये भूस्खलन! त्रिशूली नदीत वाहून गेल्या दोन बस, ७ भारतीयांसह ६५ जण बेपत्ता
अखेर पोलिसांनी सोडवली वाहतूक कोंडी
एक्स्प्रेस वेच्या अधिकाऱ्यांनी TOI ला दिलेल्या माहितीनुसार दुपारी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. स्टेट हायवे सेफ्टी पेट्रोल (HSP) चे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, “मुसळधार पाऊस जवळपास एक- दीड तास पडत होता. त्यामुळे धुके निर्माण झाले तसेच एक्स्पेस वेवर पुणे कॉरिडॉरमध्ये पाणी साचले होते.” HSP अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील पुरानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून एक्सप्रेसवेवरील सर्व वाहनांची हालचाल जवळपास २० मिनिटे थांबवली. अखेर पाणी ओसरल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलीस अधिकारी पुढे म्हणाले, “एक्स्प्रेसवेवरील वाहनांची हालचाल संध्याकाळी ५ च्या सुमारास पूर्वपदावर आली.”
पोलीस उपायुक्त, एचएसपी, गजानन टोम्पे यांनी रविवारी संध्याकाळी सांगितले, “मुसळधार पावसानंतर खंडाळा घाट विभागात वाहने संथ गतीने जात आहेत. आमची टीम त्या ठिकाणी रहदारीचे व्यवस्थापन करत आहे.”
लोणावळ्यात २४ तासांमध्ये २४० मिमी पावसाची नोंद
लोणावळ्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून, गेल्या २४ तासांत तब्बल २४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या विक्रमी मुसळधार पावसाने लोकप्रिय हिल स्टेशनला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आनंददायी वातावरण निर्माण केले आहे, ज्यामुळे त्यांना मान्सूनच्या पावसाचा आनंद घेण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
पुणे घाट क्षेत्रात अतिवृष्टी (मिमी) (१४ जुलै सकाळी)
खंडाळा २६४ मि.मी
लोणावळा २४१.५ मिमी
ताम्हिणी ३१५ मिमी
दावडी २२२ मि.मी
भिरा २२७ मि.मी
मुळशी ११८
पवना १३२
टेमघर १०५
भुशी धरणात आधीच क्षमतेने पाण्याचा प्रवाह वाढला आहे, त्यामुळे धरणाच्या पायऱ्यांवरून जोरदार प्रवाह सुरू झाला आहे. अपघाताचा संभाव्य धोका आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला. पावसाचा जोर आणि पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत भुशी धरण पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.