Wayanad landslide Flood : केरळच्या वायनाड जिल्ह्यात ३० जुलै रोजी झालेल्या भीषण भूस्खलनात २१९ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला; तर अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. अद्याप या ठिकाणी बचावकार्य चालू आहे. दरम्यान, वायनाडमधील भूस्खलनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यातून पुराचे भयानक दृश्य समोर आले आहे; ज्यात एक संपूर्ण घर पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. जो कथितरीत्या वायनाडमधील असल्याचे सांगितले जात आहे. पण हा व्हिडीओ खरंच वायनाडमधील पुराचा आहे का? याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल? (Wayanad Landslides Updates)

X यूजर E_Jeeva ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केला.

Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Work of second tunnel in Matheran hill of Baroda Mumbai highway completed
बडोदा मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण
Jammu and Kashmir Terrorist Attack CCTV Video
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा CCTV Video समोर; गांदरबलमध्ये ‘त्या’ रात्री काय घडलं?
Bengaluru building collapse
Building Collapses: पत्त्यासारखी कोसळली इमारत; ५ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक व्हिडीओ व्हायरल
Mild earthquake tremors in Nanded
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; हदगाव तालुक्यात केंद्रबिंदू
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
खेड शिवापूर टोलनाका परिसरात मोटारीतून कोट्यवधी रुपये जप्त
thane lift collapse at Raymond
ठाणे: रेमंड इमारतीतील उद्वाहक कोसळले, ११ वर्षीय मुलगा जखमी

इतर वापरकर्तेदेखील हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही व्हिडीओमधून मुख्य फ्रेम्स मिळवून, त्यांचा स्रोत शोधण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून त्याचा तपास सुरू केला.

आम्हाला reddit.com वर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

शीर्षक होते (भाषांतर) : चीनमधील मेझौ परिसर पुरामुळे सहा तासांच्या आत पाण्याखाली गेला.

आम्हाला हा व्हिडीओ जका पार्करच्या यूट्यूब चॅनेलवरदेखील सापडला.

८ जुलै २०२४ रोजी अपलोड केलेल्या या व्हिडीओचे शीर्षक होते : Amazing video of the mid-June flooding in Meizu, Guangdong, China

आम्हाला इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला व्हिडीओदेखील सापडला.

Read More Fact Check News : बाबो, हा भूताशी तर बोलत नाही ना! इमारतीच्या सीसीटीव्हीतील ‘तो’ व्हायरल video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

पाच आठवड्यांपूर्वी अपलोड केलेल्या व्हिडीओचे शीर्षक होते (अनुवाद) : शॉकिंग इमेजेस ऑफ मीझौ फ्लड्स : टाइमलॅप्स १६ जून रोजी विनाशकारी पूर आला. पण, या ठिकाणी पूर येणे सुरूच आहे. या पुरात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

व्हिडीओमध्ये नमूद केलेली तारीख 2024-06-16 होती

आम्हाला vk.com वर अपलोड केलेला व्हिडीओदेखील सापडला, जो एक रशियन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.

https://vk.com/wall-21245447_854773

व्हिडीओचे शीर्षक होते (अनुवाद) : Meizhou (Guangdong, China, 06/16/2024) मध्ये पूर.

सीसीटीव्ही फाइल्सवर नमूद केलेल्या तारखेचा स्पष्ट उल्लेख आहे. क्लिप जून महिन्यातील आहे; पण वायनाड भूस्खलनाची घटना ३० जुलै रोजी घडली होती. त्यावरून असे सूचित होते की, व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

आम्हाला एक बातमी अहवालदेखील सापडला; ज्यामध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचे व्हिज्युअल होते. हा व्हिडीओ बातम्यांच्या अहवालात एम्बेड केला गेला होता.

驚現重大人禍慘劇! 中國九省暴雨肆虐洪水連天 梅州洩洪視頻曝光 新疆熱到融化

निष्कर्ष :

चीनमध्ये जूनच्या सुमारास आलेल्या भीषण पुराचा व्हिडीओ वायनाडमधील पुराचा व्हिडीओ असल्याचे सांगून व्हायरल केला जात आहे. त्यामुळे व्हायरल होणारे दावे खोटे आहेत.