पुणे शहराची प्रगती वेगाने होत आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, कंपन्या पुण्यात सुरू झाल्याने अनेक तरुण मंडळी नोकरीच्या शोधात गावाकडून शहरात येऊन स्थायिक होत आहे. दिवसेंदिवस पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे पुणे शहरातील पायभूत सुविधा कमी पडत आहे. पुण्यातील सर्वात मोठी समस्या वाहतूक कोंडीची आहे पण त्याला कारण फक्त वाढती वाहनांची संख्या नाही तर चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले रस्ते आणि पुल देखील आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी नव्याने पूल आणि रस्ते उभारण्यात आले पण काही रस्त्यांचे आणि पुलांचे नियोजन चुकल्याने वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी आणखीच वाढत आहे. चुकीच्या नियोजनाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे पुणे विद्यापीठ चौकातील पुल. आता हा पूल पाडून पुन्हा नव्याने उभारला जात आहे पण त्यामुळे वाहतूक कोंडी आणखीच वाढली आहे. पुण्यात असेही काही भुयारी मार्ग आहे जे वापरले जात नसल्याने बंद पडले आहेत. पण असे काही भुयारी मार्ग आहे जे वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी आणि भलामोठा रस्ता ओलंडण्यासाठी नागरिकांना फायदेशीर ठरतात.
पुण्यातील हा भुयारी मार्गाचा व्हिडीओ व्हायरल
रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना भुयारी मार्गाचा वापर करता येतो. हा भुयारी मार्ग फक्त पादचाऱ्यांसाठीच नव्हे तर दुचाकी स्वारांसाठी देखील उपयुक्त ठरतो आहे. अनेकदा येथून चारचाकी वाहनेही जातात. अनेक रहिवासी या मार्गाचा रोज वापर करतात.
सोशल मीडियावर या मार्गाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि पुण्यातील प्रत्येक चौकाक असा शॉर्टकट असला पाहिजे आणि फक्त दुचाकी वाहनांना प्रवेश दिला पाहिजे. व्हिडिओ इंस्टाग्रामवर pune_is_loveee शेअर केला आहे. व्हिडीओवर कमेंट कर पुणेकरांनी आपले मत मांडले आहे.
व्हिडीओवर कमेंट करत एकाने सांगितले की, “बिबवेवाडी रोड तावरे कॉलनी चौक येथील भुयारी मार्ग आहे.
पुणेकरांनी केल्या कमेंट
एकाने कमेंट केली की, “सायकल ट्रकसारखे दुचाकी ट्रॅक असायला पाहिजे.”
दुसऱ्याने कमेंट केली की, “म्हणजे सर्वांना माहित होईल तो शॉर्टकट आणि तिथेपण वाहतूक कोंडी होईल.”
पावसाळ्यात या भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने एकाने कमेंट केली की, पण शॉर्टकटने पावसाळ्यात जाऊन दाखवावे” तर दुसरा म्हणाला की,”पावसाळ्यात हा ट्रॅक मधून पोहण्याचा आनंद घेता येतो.”
आणखी एकाने लिहिले की, “अशी सुविधा हवी की, फक्त सायकलवाले जाऊ शकतील जेणेकरून सायकलीचा वापर वाढेल आणि प्रदूषणाला आळा बसेल . तसेच ज्यांना जास्त अंतरावर जाऊन दुचाकी लावायची आहे ते जास्तीत जास्त मेट्रो, पीएमटी बसच वापर करू शकतात किंवा एकाच ऑफिसमधील २ जण एका गाडीवर असेही जाऊ शकतात. अगदी लगेच नाही पण हळू हळू फरक पडेल.”