पुणे शहराची प्रगती वेगाने होत आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, कंपन्या पुण्यात सुरू झाल्याने अनेक तरुण मंडळी नोकरीच्या शोधात गावाकडून शहरात येऊन स्थायिक होत आहे. दिवसेंदिवस पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे पुणे शहरातील पायभूत सुविधा कमी पडत आहे. पुण्यातील सर्वात मोठी समस्या वाहतूक कोंडीची आहे पण त्याला कारण फक्त वाढती वाहनांची संख्या नाही तर चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले रस्ते आणि पुल देखील आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी नव्याने पूल आणि रस्ते उभारण्यात आले पण काही रस्त्यांचे आणि पुलांचे नियोजन चुकल्याने वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी आणखीच वाढत आहे. चुकीच्या नियोजनाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे पुणे विद्यापीठ चौकातील पुल. आता हा पूल पाडून पुन्हा नव्याने उभारला जात आहे पण त्यामुळे वाहतूक कोंडी आणखीच वाढली आहे. पुण्यात असेही काही भुयारी मार्ग आहे जे वापरले जात नसल्याने बंद पडले आहेत. पण असे काही भुयारी मार्ग आहे जे वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी आणि भलामोठा रस्ता ओलंडण्यासाठी नागरिकांना फायदेशीर ठरतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा