Viral Video: महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला वेळ काढून आवडीच्या गाण्यावर रील बनवताना दिसतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशीच एक महिला नऊवारी नेसून सुंदर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टींचा ट्रेंड सतत बदलत असतो. मग ती गाणी असो किंवा एखादा डान्स व्हिडीओ, यावर सतत विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर लोक मोठ्या प्रमाणात रिल्स बनवताना दिसतात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’ हे मराठमोळं गाणं तुफान चर्चेत आहे. या गाण्यावर लोकांनी लाखो रिल्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दरम्यान, आता सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सुसेकी’ गाणं खूप चर्चेत आहे, ज्यावरील अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात महिलेने सुरुवातीला याच गाण्यावर डान्स केला पण पुढे अचानक ती ‘लाजरा न्‌ साजरा मुखडा’ या गाण्यावर डान्स करायला सुरुवात करते. या सुंदर डान्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

या व्हायरल व्हिडीओतील महिलेने पिवळ्या रंगाची साडी नेसून संपूर्ण मराठमोळा लूक केलेला आहे. यावेळी ती सुरुवातीला चर्चेत असलेल्या ‘सुसेकी’ गाण्यावर डान्स करते पण इतक्यात ‘लाजरा न्‌ साजरा मुखडा’ हे मराठमोळं गाणं लागत आणि त्यावर ती ठेका धरते. या गाण्यावरील डान्स स्टेप्स आणि महिलेचे एक्सप्रेशन्स खूप सुंदर आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना देखील दिसत आहेत.

हेही वाचा: काँग्रेसच्या युवा नेत्या रोशनी कुशल जयस्वाल यांचा Video Viral; हेल्मेटविनाच चालवली बाईक, नेटकरी म्हणाले, “कडक कारवाई…”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @aaroosonawane17 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत पंधरा हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “खूप सुंदर डान्स”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मराठी मुलगी”, तर इतर युजर्स डान्सचं कौतुक करताना दिसत आहेत.

दरम्यान, यापूर्वी देखील असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी काही महिलांनी गुलाबी साडी या गाण्यावर नऊवारी नेसून सुंदर डान्स केला होता.

Story img Loader