देशभरामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाचा संसर्ग होण्याच्या भीती स्वत:च्याच नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्याच्या काही घटनाही समोर आल्या आहेत. अशाच पश्चिम बंगालमध्ये मात्र एका स्थानिक नेत्याने करोनाची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तीला चक्क बाईकवरुन चाचणीसाठी घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णाला मदत करण्यासाठी या तरुण नेत्याने आधी स्वत:च्या पैशाने पीपीई कीट विकत घेतलं आणि मग त्या पीपीई कीटमध्येच बाईक चालवत तो या रुग्णाला चाचणीसाठी रुग्णालयात घेऊन गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार सत्यकाम पटानाईक हा तरुण तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) यूथ विंगमध्ये काम करतो. तो गोपीबल्लबपूर येथील ब्लॉक एकमध्ये टीएमसीचे काम पाहतो. काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या यूथ विंगचे प्रमुख आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी करोना बाधितांना मदत करण्यासाठी पक्षाच्या युवा वॉरियर क्लबचं उद्घाटन केलं आहे. सत्यकाम या गटाचा सदस्य असून या गटामार्फत सर्वसामान्यांना करोनाशी संबंधित अडचणींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मदत करण्यात येते.

नक्की पाहा >> Viral Video : तिने PPE कीट काढलं अन्… ; हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही करोनायोद्ध्यांच्या अभिमान वाटेल

सत्यकाम याला सिजूआ गावातील एका स्थलांतरित मजूरामध्ये करोनाची लक्षणं दिसत असल्याचे समजले. मात्र या व्यक्तीला रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने तो घरीच असल्याचेही सत्यकाम याला कळालं. त्यामुळेच त्याने स्वत: या रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाण्याचं ठरवलं. या व्यक्तीची मदत करण्यासाठी सत्यकामने आधी पीपीई कीट विकत घेतलं. त्यानंतर एका मित्राकडून बाईक घेऊन तो थेट सिजूआ गावी पोहचला. या गावामधील ४३ वर्षीय अमाल बारीक यांना करोनाची लक्षणं दिसत असल्याने त्यांना बाईकवर आपल्या मागे बसवून तो थेट स्थानिक रुग्णालयामध्ये गेला. तेथे करोना चाचणीसाठी अमाल यांचे स्वॅब सॅम्पल घेण्यात आले. चाचणीचा निकाल येईपर्यंत घरीच थांबण्यास सांगण्यात आलं आहे. ही चाचणी झाल्यानंतर सत्यकाम याने अमाल यांना पुन्हा घरी आणून सोडलं. हे अंतर केवळ तीन ते चार किलोमीटरचं होतं. मात्र करोनाच्या संसर्गाची भिती आणि रुग्णावाहिका उपलब्ध होत नसल्याने अमाल यांना चाचणीसाठी रुग्णालयात जाता येत नव्हते.

सत्यकाम यांने पुढाकार घेऊन स्वखर्चाने केलेल्या या कामाचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पीपीई कीट घालून बाईक चालवणारा सत्यकाम आणि त्याच्या मागे मास्क लावून बसलेल्या अमालचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.