Wedding bride dance video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. दरम्यान अशाच एका नवरीने आपल्या नवरदेवाच्या स्वागतासाठी भन्नाट असा डान्स केला आहे. नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या नवरीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे.

नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तिचा डान्स पाहून सासरचे मंडळींही अवाक् झाले आहेत.

couple dance video husband wife dance in wedding on marathi song Hridayi Vasant Phulatana goes viral
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे! हृदयी वसंत फुलताना गाण्यावर मराठी कपलचा हटके डान्स; VIDEO तुफान व्हायरल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Little Boy Dressed up as dada Kondke
घाबरलेल्या, वैतागलेल्या चिमुकल्या दादा कोंडकेचा VIDEO मनाला भिडला; हावभाव नाही तर डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फिदा
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
a old man dance in the village on nachare mora ambyachya vanat marathi song video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गाण्यावर भर कार्यक्रमात आजोबांनी केला अजब डान्स; VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Groom dance on marathi song
VIDEO: “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” मारवाडी नवरदेवानं बायकोसाठी मराठी गाण्यावर केला खतरनाक डान्स
Grandmother funny dance video goes viral on social media trending video
VIDEO: “आयुष्य दुसऱ्याच्या धाकात नाही स्वतःच्या थाटात जगायचं”; आजीचा मनमुराद डान्स, हटके स्टाईल पाहून तम्हीही पोट धरुन हसाल

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नवी नवरी बेभान होऊन नाचताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तेथे उपस्थित महिलाही थिराकायला लागल्या आहेत. साधारणपणे नवीन नवरी या शैलीत दिसत नाहीत. सासरच्या घरी ती सुरुवातीला लाजाळू असते. मात्र, या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी नवरी जराही न लाजता बेभान नाचत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही नवरी आपल्या नवऱ्यासाठी हा डान्स करत आहे. नवरदेवानं घोड्यावर वऱ्हाडासोबत मंडपात एन्ट्री मारताच नवरी डान्स करत त्याची लांबून नजर काढत आपल्या शैलीत जबदस्त असा डान्स करताना दिसत आहे. “असल्या या गावात माझ्या मी पेचात नावाची गोजीरी” या गाण्यावर ही नवरी नवरदेवासमोर डान्स करत आहे. यावेळी पाहुणे मंडळीही या नवरीला पाहतच राहिले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “निवडणुकांच्या तोंडावर फक्त खोटी आश्वासनं” १५ मिनिटांच्या प्रवासाला दोन तासांची रांग; मढ जेट्टीचा VIDEO पाहून येईल संताप

हा व्हिडीओ सोशल मीडियावर mi_and_tu या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी”. तर आणखी एका युजरने “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader