Bride surprise dance video: सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपासून लग्नातील अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नातील अनेक परंपरा तर कधी गमतीदार गोष्टी पाहण्यासाठी मिळतात. त्यात पुन्हा एकदा लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. लग्न म्हटलं की, मजा मस्ती, चालीरिती अन् नाच गाणी सगळं काही आलंच. लग्नात वधू वरांप्रमाणे कुटुंबीय आणि मित्रांसोबत देखील खूम मजा करतात. यावेळी नवरदेव आणि नवरी हे लग्नाचे मुख्य आकर्षण असतात. आजकाल लग्नाची परंपरा जरा वेगळी झालीये. अनेक लग्नात संगीत हा प्रकार पहायला मिळतो. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
स्वत:चं लग्न खास बनवण्यासाठी वधू आणि वर डान्स करताना दिसतात. अशाच एका लग्नाच्या फंक्शनमध्ये वधू मनापासून नाचताना दिसत आहे. पूर्वी लग्नसराई म्हटलं की शुभ मुहूर्त, मानपान, लग्नातील विधी याकडे अधिक लक्ष दिलं जायचं. परंतु, आताच्या लग्नांमध्ये लग्नातील वधू-वराच्या एन्ट्रीचे डान्स, भन्नाट उखाणे, फोटो, व्हिडीओ याकडे अधिक लक्ष दिलं जातं. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सोशल मीडियावरही लग्नातील अनेक हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी तिच्या एन्ट्रीला डान्स करताना दिसतेय.
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. दरम्यान अशाच एका नवरीने आपल्या नवरदेवाच्या स्वागतासाठी भन्नाट असा डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरीने पिवळया रंगाची नऊवारी साडी नेसली आहे आणि मैत्रीणींसोबत भन्नाट असा डान्स केला आहे. “राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का?” या मराठमोळ्या गाण्यावर नवरीनं डान्स केला आहे. यावेळी नवरदेवही शेवटी नवरीसोबत थिरकताना दिसत आहे. तसेच नवरदेवाची रिअॅक्शनही पाहण्यासारखी आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ love.ud.most या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी”. तर आणखी एका युजरने “जेव्हा नवरीच्या सगळं मनासारखं मिळतं” अशी प्रतिक्रिया दिली आहे.