Wedding bride dance video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तिचा डान्स पाहून सासरचे मंडळींही अवाक् झाले आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नवी नवरी बेभान होऊन नाचताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तेथे उपस्थित महिलाही थिराकायला लागल्या आहेत. साधारणपणे नवीन नवरी या शैलीत दिसत नाहीत. सासरच्या घरी ती सुरुवातीला लाजाळू असते. मात्र, या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी नवरी जराही न लाजता बेभान नाचत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही नवरी आपल्या नवऱ्यासाठी हा डान्स करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरीनं “सांगाया तर सोपे… सांगाया तर सोपे पण कठीण सगळे. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी त्या घरची..राणी मी राजाची जमवून घेईन कशी-बशी, थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी त्या घरची” या गाण्यावर डान्स केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पुणेकरांचा नाद नाय! हॉटेलच्या मेन्यू कार्डवर टाईमपास करणाऱ्या ग्राहकासांठी जबरदस्त मेन्यू; PHOTO पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर marathi_royal_karbhar या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी”. तर आणखी एका युजरने “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding bride dance video bride on song honar sun mi ya gharachi dance after seeing his groom on stage bride video goes viral on social media srk