Viral Wedding Card: प्रत्येक जण आपलं लग्न काहीशा खास पद्धतीने करत अविस्मरणीय क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. लग्नासाठी सजावटी, कपड्यांपासून ते स्टाईलपर्यंत अनेक हटके ट्रेंडचे व्हिडीओ समोर येत असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका आगळ्या-वेगळ्या लग्नपत्रिकेची चर्चा सुरू आहे. या लग्नपत्रिकेने मात्र सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ही आगळी-वेगळी लग्नपत्रिका नेमकी आहे तरी कशी, जाणून घेऊया…

लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. यात लग्नपत्रिकाही अपवाद नाही. कधी लग्नपत्रिकाच विचित्र असते, तर कधी त्यातील मजकूर. अशा कितीतरी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यात आता आणखी एका लग्नपत्रिकेची भर पडली आहे. सोशल मीडियावर अशी दृश्ये पाहायला मिळतात, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो लग्नपत्रिकेशी संबंधित आहे. यामध्ये लग्नपत्रिकेला असा लूक देण्यात आला आहे की, प्रथमदर्शनी सर्वांनाच धक्का बसेल.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Cyber ​​scam under the pretext of wedding invitation Nagpur news
विवाह निमंत्रणपत्रिकेच्या बहाण्याने सायबर घोटाळा; ‘एपीके फाइल’ने राज्यात अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड
Lagnanantar Hoilach Prem New Promo
लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती

यात असे दिसते की, ज्या व्यक्तीने लग्नपत्रिका छापली, त्याने पाहुण्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी एक संपूर्ण योजना तयार केली आहे. त्यांनी आयफोनच्या आकारात लग्नाची पत्रिका तयार करून घेतली. पहिल्या दृष्टिक्षेपात ही लग्नपत्रिका अगदी फोनसारखी दिसते. तुम्हाला ही लग्नपत्रिका मिळाली असेल तर आनंदी होऊ नका, कारण तुमचा पोपट होऊ शकतो. कारण हा आयफोन नव्हे तर एक लग्नपत्रिका आहे. फ्रेममध्ये टिपलेले समोरचे दृश्य आणखी खरोखरच मनोरंजक आहे.

(हे ही वाचा: PHOTO: “उधार फक्त…” फुकट्या ग्राहकाला कंटाळून दुकानाबाहेर लावलेली ‘ही’ पाटी वाचून तुम्हीही पोट धरून हसाल )

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, लग्नाची पत्रिका अनोख्या स्वरूपात बनवण्यात आली आहे. ही लग्नपत्रिका आयफोनसारखी दिसते. त्यामध्ये बुकलेट स्टाईल लेआउट दिसत असल्याचे तुम्हाला दिसेल. या लग्नपत्रिकेमध्ये एकूण तीन पाने दिसतात. पहिल्या पानावर वधू-वराचा फोटो छापलेला असतो. याशिवाय तारखेसह तपशीलही त्यात नमूद केला आहे. व्हॉट्सॲप चॅटची पार्श्वभूमी दुसऱ्या पेजवर दिसते. बाकीचे तपशीलही यात दिलेले आहेत. तिसऱ्या पानावर तुम्ही ठिकाणाचा नकाशा पाहू शकता. अशा प्रकारे मोठ्या कल्पकतेने लग्नपत्रिका तयार करण्यात आली आहे.

येथे पाहा व्हिडीओ

या अनोख्या लग्नपत्रिकेशी संबंधित व्हिडीओ laxman_weddingcards नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. हे पाहताच युजर्सनाही भुरळ पडू लागली आहे. यावर एकामागून एक प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडीओला लाखो लाइक्स आणि व्ह्यूजही मिळाले आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “मी माझ्या आयुष्यात अशी लग्नपत्रिका पाहिली नाही.” दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “भाऊ, याची किंमत किती आहे.”

Story img Loader