लग्नसराईचा हंगाम सुरू असून काही उपद्रवी लग्नसमारंभात शस्त्रे उगारत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लग्न समारंभात शस्त्र उगारणे आणि गोळीबार करण्याचा घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहे. प्रशासनाची बंदी असतानाही वारंवार शस्त्रे उगारण्याचे व्हिडीओ समोर येत आहेत.असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून गोपालगंजमधला असल्याचं बोललं जात आहे. एक तरुण बंदूक नर्तकीच्या पोटावरून ठेवून नाचताना दिसत आहे. लग्न समारंभात ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या तरुणाने हातात बंदूक घेऊन स्टेजवर डान्स केला.
या कार्यक्रमासाठी नर्तकीला बोलावण्यात आले होते. तेव्हा तरूण स्टेजवर चढला आणि हातात शस्त्र घेऊन नाचू लागला. सरकारी आदेश धुडकावून लावत तरुण बंदूक घेऊन नाचू लागला. तो फक्त हातात बंदूक घेऊन नाचत नव्हता, तर नर्तकीच्या दिशेने बंदूक दाखवून ट्रिगरवरची बोटे फिरवत होता. बंदुकीचा ट्रिगर दाबला असता तर काय झाले असते, याचा विचार न केलेलाच बरा.
या प्रकरणाचा तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे. तरुणाची ओळख पटल्यानंतर लवकरच त्याला अटक करण्यात येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकरी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.