लग्न हा प्रत्येक नवरीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. लहानपणापासून प्रत्येक मुलगी आपल्या लग्नाची सुंदर स्वप्न रंगवते. लग्नात कोणती साडी घालणार, कशी एन्ट्री घेणारपर्यंत सर्व गोष्टी मुली ठरवतात आणि जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा त्या सर्व गोष्टी करून आपले स्वप्न पूर्ण करतात. पण अनेकदा आपण विचार करतो एक आणि घडते वेगळंच काहीतरी. असाच काहीसा प्रकार एका नवरीबरोबर घडला आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या नवरीबरोबर जे काही घडले त्याची कल्पनाही कोणी केली नसेल. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे. अशी वेळ कोणत्याही नवरीवर येऊ नये अशीच भावना व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येत आहे.
कॅनडामध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने त्यांचे लग्न संस्मरणीय बनवण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांना महागात पडले. वधूला गंभीर दुखापत झाल्याने तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण दुःखात बदलला. नक्की काय घडले जाणून घेऊ या…
लग्नाचे फोटोशूट सुरू असताना फुटला कलर बॉम्ब
कॅनडामधील भारतीय वंशाच्या जोडप्याने विकी आणि पिया यांनी त्यांच्या पारंपारिक लग्नासाठी बंगळुरू शहराची निवड केली. त्यांचे लग्न संस्मरणीय आणि सौंदर्यपूर्ण बनवण्यासाठी या जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या अल्बमसाठी एक जबरदस्त शॉट हवा होता. फोटोशूट दरम्यान त्याने रंगीत स्मोक बॉम्ब वापरला जो त्याच्यासाठी घातक ठरला.
नवरीच्या केसांना आग लागली, पाठीलाही भाजले
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहून शकता की, पांढऱ्या रंगाच्या सुंदर पोशाख वधू आणि वर यांनी परिधान केला आहे. नवरदेव आपल्या नवरीला उचलून घेऊन फोटो असतो तेव्हा त्यांच्या मागे रंगीत स्मोक बॉम्ब फुटतो. फोटो काढताना रंगीत बॉम्बचा वापर केला जातो जेणेकरून सुंदर फोटो येतील पण येथे नेमके उलटे घडले. रंगीत स्मोक बॉम्ब वधूजवळच फुटला ज्यामुळे तिचे केस जळून गेले आणि तिची पाठ अक्षरश: भाजली. या घटनेमुळे बरीच घबराट पसरली.
नक्की काय घडले?
viaparadise नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये असे लिहिले आहे – “आमच्या योजनेनुसार, रंगीत बॉम्ब मागे फुटणार होता, परंतु तो थेट आमच्यावरच फुटला. आम्ही आमच्या मुलाला आमच्याबरोबर घेऊन जाणार होतो, जर तो आमच्याबरोबर असता तर काय झाले असते याचा विचार करा. व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे की, अपघातानंतर, जोडपे ताबडतोब जवळच्या रुग्णालयात गेले आणि नंतर तेथून रिसेप्शनमध्ये सामील होण्यासाठी आणि उर्वरित कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी परतले.
लग्नात फटाके वापरता काळजी घ्या
या व्हिडिओमध्ये, वधूच्या पीठावर जळलेल्या खुणा दाखवल्या आहेत. जोडप्याने त्यांच्या पोस्टमध्ये लोकांना इशारा दिला आहे की,”ग्नासारख्या खास प्रसंगी असे फटाके वापरताना खूप काळजी घ्यावी. त्यांनी लिहिले – “आम्ही सर्व सुरक्षा उपायांचा अवलंब केला होता, परंतु अपघात झाला. तुम्ही वाईट नजरेवर विश्वास ठेवा किंवा न ठेवा, आम्ही ते आता करू.”