Viral wedding video: वेगवेगळ्या समारंभातील व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेषतः लग्नातील व्हिडीओ. लग्नातील मजा मस्ती करतानाचे अनेक मजेशीर, विचित्र व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. दरम्यान, ‘सात समुंदर पार तेरे पीछे पीछे आ गया’ हे सुपरहिट गाणं जळपास प्रत्येकांनं ऐकलं असेल. आपल्या पैकी काही जणांनी तर आपल्या प्रिय व्यक्तीसाठी हे गाणं गायलं देखील असेल. पण या गाण्यात कवीने जी संकल्पना मांडली आहे ती प्रत्यक्षात कोणी उतरवायला गेलं तर त्याचं काय होईल? ऐकूनच गंमत वाटतेय ना? तर मग हा व्हिडीओ पाहा.
उतावळा नवरा घुडग्याला बाशींग म्हणतात ना ते असे, मुसळधार पाऊस सुरु आहे. अहो, एवढंच नाही तर अक्षरश: पूरजन्य परिस्थिती आहे. दुथंडी भरून पाणी वाहतेय. पण तरी देखील नवऱ्यानं लग्नासाठी चक्क पुराच्या पाण्यातून वाट काढलीय. अन् लक्षवेधी बाब म्हणजे पाठीमागून वऱ्हाडी देखील या पाण्यात उतरण्याची तयारी करत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील दंगच व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाणी दुथडी भरून वाहात आहे. पाण्याचा वेग इतका जास्त आहे की जर एखाद्याचा तोल गेला तर तो वाहून देखील जाईल. अशा पाण्यात नवरदेव वऱ्हाड्यांसोबत उतरला. काहीही झालं तरी चालेल पण आज लग्न करूनच राहणार अशा आवेगात पावसाची पर्वा न करता तो लग्न करायला घराबाहेर पडला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> माकड आणि टोपीवाल्याच्या गोष्टीचं लेटेस्ट व्हर्जन होतंय तुफान व्हायरल…तुम्ही VIDEO पाहिला का?
घटना नेमकी कुठली आहे? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटलं? तुम्ही देखील नक्की सांगा आमच्या सोशल मीडिया कमेंट सेक्शनमध्ये.नवरा-नवरीचे भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर लाखोंच्या संख्येत या व्हिडीओला व्यूजही मिळाले आहेत.