Wedding Funny Video : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे सोशल मीडियावरही दररोज लग्नसमारंभासंबंधित अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात, ज्यांना लाखोंच्या घरात व्ह्युज असतात. यातील काही व्हिडीओ फार भावनिक असतात तर काही फार मजेशीर असतात, जे आपल्याला खळखळून हसवतात. सध्या एका लग्नसमारंभातील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून १०० टक्के तुम्ही पोट धरून हसाल. व्हिडीओत लग्न सुरू असतानाच पंडितजींना अचानक राग येतो आणि ते नवरदेवाच्या मित्रांबरोबर असं काही वागतात की पाहून तुम्हीही जोरजोरात हसाल. पण पंडितजींचे असे वागणे योग्य आहे का आम्हाला व्हिडीओ पाहून सांगा.
पंडितजींची रिअॅक्शन पाहून तुम्ही मात्र पोट धरून हसाल
व्हिडीओमध्ये पंडितजींना जरी राग आला असला तरी रागावलेल्या पंडितजींची रिअॅक्शन पाहून तुम्ही मात्र पोट धरून हसाल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भरलग्नमंडपात नवरा- नवरी विधीवत सात फेरे घेत आहेत. यावेळी त्यांच्यावर पाहुणे मंडळींकडून फुलांचा वर्षाव होतोय. नवरदेवाचे मित्र यावेळी तिथेच स्टेजवर उभे राहून नवरा-नवरीवर फुलं टाकतायत. पण, त्यांची फुलं टाकण्याची पद्धत इतकी विचित्र होती की पाहून कोणालाही राग येईल; कारण ते नवरा-नवरीवर फुल टाकत नव्हते तर अक्षरश: फेकून मारत होते, जी तिथे मंत्रोच्चार करणाऱ्या पंडितजींच्या अंगावरही पडत होती. ज्यामुळे पंडितजींना राग येतो आणि ते हातातील एक बॉक्स समोर उभ्या असलेल्या नवरदेवाच्या मित्रांच्या अंगावर फेकून मारतात.
पंडितजींनी रागाच्या भरात केली बडबड
यावेळी पंडितजी रागाच्या भरात काहीतरी बोलतानाही दिसत आहेत, पण पुढे काय होते ते व्हिडीओमध्ये दिसत नाही.
लग्नसमारंभातील हा मजेशीर व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना, ‘लग्नविधीदरम्यान फुलं फेकण्यावरून पंडितजी आणि काही लोकांमध्ये भांडण झाले’ असे कॅप्शन लिहिले आहे.
२५ फूट लांब, ४५ इंच जाड, महाकाय अजगराचा झाडावर चढतानाचा धडकी भरवणारा VIDEO, पाहून तुमचाही उडेल थरकाप
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, पंडितजींना इतका राग छान वाटत नाही, ते प्रेमानेही बोलू शकले असते. दुसऱ्या युजरने लिहिले, त्याचे मित्र निरक्षर वाटतात, पंडितजीने त्यांच्याशी योग्य ते केले. तिसऱ्या युजरने लिहिले, पंडितजींनी अनावश्यक राग दाखवला. शेवटी एका युजरने लिहिले की, पंडितजींनी बरोबर केले.