Viral video: लग्नात नवरा-नवरी आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करतात. नातेवाइकांमध्ये लग्नात अनेकदा नाराजी पाहायला मिळते. अनेक नातेवाईक नावं ठेवण्यात व्यस्थ असतात. काही लोक जेवणाला नावं ठेवतात तर काही नवरा नवरीच्या कपड्यांवरुन बोलतात. तर काहीजणांची रुसवा-फुगवी सुरु असते. नातेवाईकांच्या याच सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा नवरा नवरी लग्नात नाराज पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील नवरदेवाची परिस्थिती पाहून तुम्हाला त्याच्यावर दया येईल. नक्की काय घडलं ते जाणून घेऊया. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, असे नातेवाईक नको रे बाबा.
सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात. खास करुन नवरदेवाच्या किंवा नवरीच्या कलवऱ्यांची तर लग्नात हमखास चर्चा असते. कधी नवरदेवाचे बूट चोरतात तर कधी नवरदेवासोबत गंमत करतात.
एका नवविवाहित जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्यांच्या लग्नाच्या रात्री नवरा आणि नवरी लग्नानंतर एका खोलीत बसलेले दिसत आहेत. यावेळी नवरदेव खोलीच्या एका कोपऱ्यात निरशाजनक नजरेने खुर्चीवर बसला आहे. तर नवरी जमिनीवर आपल्या लग्नाच्या लेहंग्यात खाली मान करून बसली आहे. नातेवाईकही त्यांच्या बेडवर येऊन झोपले आहेत. त्याचबरोबर काही महिला बेडवर बसलेल्याही दिसतात. तर वर खुर्चीवर बसलेला दिसतोय, उदास वाटत आहे. नातेवाइकांच्या या कृतीमुळे तो किती चिडला आहे, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून येते.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ foofaji नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.