Wedding groom bride dance video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. अशातच आता डान्सशिवाय लग्न पूर्ण होतच नाही. अशाच एका लग्नात नवरा नवरीने भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाहून तुम्हीही कौतुक कराल.

आपलं लग्न झालं याचा आनंद प्रत्येकाला असतो, जो नवरा-नवरीच्या चेहऱ्यावरील हास्यातून झळकतो. पण काही नवरा-नवरी असे असतात जे हा आनंद फक्त हास्यातून दाखवत नाही. तर त्यांना खुलेपणाने व्यक्त करायला आवडतं. अशाच एका नवरा नवरीच्या रोमँटिक डान्सचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

लग्नापूर्वी अनेक विधी पार पाडले जातात. हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा. साधारणपणे लग्नाचे सर्व विधी झाल्यानंतर नवरदेव- नवरी एकमेकांसोबत रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहेत. यावेळी नवरी-नवरदेवाचे डान्स मूव्ह पाहून तर सारेच जण आश्चर्य झाले. हृदयी वसंत फुलताना या मराठी गाण्यावर रोमँटिक डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून येत आहेत. यावेळी नवरदेवाला पाहून नवरीचीही रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे. नवरदेव काळ्या रंगाच्या सूटमध्ये देखणा दिसत आहे, तर नवरीही सांभळ्या रंगाच्या घागरामध्ये अतिशय गोंडस दिसत आहे. नवरा नवरी रोमॅण्टिक मूडमध्ये डान्स करत असताना आजुबाजूला असणाऱ्या साऱ्यांच्याच नजरा या जोडप्यांवर होत्या.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भर वर्गात शिक्षकाच्या पँटमध्ये अडकला किंग कोब्रा; बाहेर काढायला जाताच काढला फणा अन्…VIDEO चा शेवट पाहून उडेल थरकाप

हा व्हिडीओ marathi_weddingz या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. मात्र बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर होऊ लागलाय. हा व्हिडीओला २१ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नवरा-नवरीच्या डान्सचं कौतूक करताना दिसत आहे.. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “नवरा भारी हौशी”.