Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की लग्नाच्या स्टेजवर अचानक येऊन दुसऱ्याच व्यक्तीने नवरीच्या भांगात कुंकू भरले.
तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हे खरं आहे. नवरदेव ऐवजी दुसऱ्याने नवरीच्या भांगात कुंकू भरले.
या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेव खूर्चीवर बसलेल्या नवरीच्या भांगात कुंकू भरत असतो तितक्यात एक दुसराच व्यक्ती हेल्मेट घालून स्टेजवर येतो आणि नवरदेवाला दूर करतो आणि स्वत: नवरीच्या भांगेत कुंकू भरतो.
नवरीला कुंकू भरत असताना आजुबाजूचे लोक त्याला थांबविण्याचा प्रयत्न करतात पण काहीही फायदा होत नाही. भांगात कुंकू भरल्यानंतर तो नवरीचा हात धरुन तिला सोबत घेऊन जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हेही वाचा : चालत्या बाइकवर कपलचा रोमान्स, सोशल मीडियावर Video Viral
सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. malwa_block80 या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर यूजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे , हे अद्याप कळले नसून भांगात कुंकू भरणारा नवरीचा प्रियकर आहे का? असा प्रश्न यूजर्स विचारत आहे.