Bride dance video: सोशल मीडियावर एका नवरीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नवरदेवाच्या एन्ट्रीवर नवरी मुलीने डान्स केला आहे. आपल्या होणाऱ्या साथीदाराला पाहताच नववधूच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य, त्या क्षणाचा आनंद आणि त्या आनंदात तिने केलेला डान्स पाहून तुम्हालाही मस्त वाटेल .लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरीनं आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी असा डान्स केलाय की पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तिचा डान्स पाहून सासरचे मंडळींही अवाक् झाले आहेत. मात्र पुढे हिच नवरी भावनीक झालेली पाहायला मिळालं. जशी ती नवरदेवाजवळ जाते तस तशी ती रडू लागते, मात्र हे तिचे आनंदअश्रू पाहून नवरदेवही पुढे येतो.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
Heart-Melting Video
VIDEO : पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं! तरुणाने सादर केली प्रेमावरची कविता; म्हणाला,”एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा पडता येत नाही” VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
little boy danced to the song aaj ki raat at restaurant the video is currently going- viral on social Media
“आज की रात मजा हुस्न का लिजीये” गाण्यावर हॉटेलमध्ये चिमुकल्याचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून थक्क व्हाल असा डान्स

किती तरी वर्ष या दिवसाची वाट बघितलेली आणि आता अखेर तो दिवस आला. प्रेम खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय हे नवरीच्या चेहऱ्यावरुन कळतंय आहे.  यावेळी पाहुणे मंडळीही या नवरीला पाहतच राहिले आहेत.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावरsayalii__makeupartist या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी”. तर आणखी एका युजरने “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader