VIral Video : “झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला” स्वयंवर झाले सीतेचे यातील या ही ओळ तुम्ही ऐकली किंवा वाचली असेल. सध्या असाच एक व्हिडीओ पाहून तुम्हाला ही ओळ पुन्हा आठवू शकते. या व्हिडीओमध्ये नवरी वरमाला घालत असताना नवरदेव चक्क गुडघ्यावर बसलेला दिसत आहे. या व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. सध्या या जोडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असं म्हणतात, प्रेमात आदर असला की प्रेम चिरकाळ टिकतं. खरं तर नवरा बायकोचं नातं हे जगातील पवित्र नातं मानलं जातं. लग्नानंतर नवरा बायको त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतात. या नात्यात प्रेम, काळजी जिव्हाळा आणि आदर असतो. सध्या असाच बायकोविषयी आदर व्यक्त करणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “… आता मला बॉयफ्रेंड नको, डायरेक्ट नवराच हवा”; अविवाहित तरुणीने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO होतोय व्हायरल

हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. नवरदेव आणि नवरी एकमेकांना वरमाला घालतात, हा लग्नातील महत्त्वाचा क्षण मानला जातो. या व्हिडीओत सुद्धा नवरी नवरदेवाला वरमाला घालताना दिसतेय. नवरी वरमाला घालणार तितक्यात नवरदेव थेट गुडघ्यावर बसतो आणि त्यानंतर नवरी वरमाला घालते. हा सुंदर क्षण पाहून तुम्हीही म्हणाल, “प्रेम असावे तर असे…” त्यानंतर व्हिडीओत पुढे नवरदेव नवरीला वरमाला घालताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

marathi_wedding_stuff या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रेमात ‘आदर’ असला की ते प्रेम चिरकाळ टिकतं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding video groom kneels and bows down in front of bride during varmala ceremony watch viral video instagram reels social media love is like a ram sita ndj