लग्न म्हटलं की नवरीचं रडणं आलंच. माहेर सोडून सासरी जाताना बहुतेक मुलींना रडू कोसळतंच…लग्नातील हा पाठवणीचा क्षण सर्वात भावुक क्षण असतो. त्यामुळे लग्नात नवरीचं रडणं तसं नवं नाही. पण कधी नवऱ्याला लग्नात रडताना पाहिलं आहे का? किंवा किमान ऐकलं तरी आहे का? नाही ना. पण अशाच नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो लग्नात चक्क नवरीसारखा रडताना दिसला.

लग्नात नवरदेवाचा काही एक वेगळाच रूबाब असतो. आपण आपल्या नवरीला वाजतगाजत घरी नेणार याचा आनंद, उत्साह त्याच्या चेहऱ्यावर असतो. नवरा शक्यतो कधीच रडताना दिसत नाही. त्यामुळे या नवऱ्याला असं रडताना पाहून नेमकं झालं तरी काय, असा प्रश्न नक्कीच पडतो.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवरदेव आपल्या पत्नीला स्टेजवर येताना पाहून खूपच आनंदी दिसून येतोय. आनंदाश्रू येऊ नयेत म्हणून भारावून गेलेला हा नवरदेव डोळे पुसतो. सामान्यपणे लग्नाच्या वेळेस मुली खूपच भावूक होताना पहायला मिळतं. मात्र या व्हिडीओत मुलगाच मुलीपेक्षा अधिक भावुक होताना दिसत आहे. आता या मुलाने इतकं भावुक होण्याचं कारण काय तर त्याची होणारी पत्नी ही लग्नानिमित्त नटून थटून आलीय आणि त्याच्यासमोर उभीय. तो थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहतो. ती फारच सुंदर दिसत असल्याने हा मुलगा क्षणभर तिला पाहत राहतो. आपल्या भावी पत्नीला नववधूच्या रुपात पाहून तो अगदीच भावुक होतो. त्याला पाहून मंडपातील इतर पाहूणे देखील भावुक होताना दिसून येत आहेत.

नवऱ्याला भावुक होताना पाहून नवरीही रडली

व्हिडीओत पाहू शकता नवरदेव त्याचे डोळे पुसतोय. त्याचे डोळे पाण्याने भरले आहेत. हळूहळू त्याच्या डोळ्यांत भरलेल्या पाण्याचा बांध फुटतो आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू बाहेर त्याच्या चेहऱ्यावर येतात. हे पाहून नवरी सुद्धा भावूक होते. तिने आपल्या रडण्यावर बराच कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. पण तरीही तिच्या चेहऱ्यावर मात्र ते भाव उमटून दिसून येतच होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ रिचा वर्मा या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर दिलेल्या कॅप्शननुसार व्हिडीओमधील नवरदेव हा चित्रपट पाहून सुद्धा रडू लागतो असं सांगण्यात आलंय. त्याचा हा स्वभाव माहिती असल्यामुळे नवरीने त्याला लग्नात रडायचं नाही, असं आधीच सांगितलं होतं. पण आयुष्यातील या खास दिवशी नवरदेवाला रडू आवरलं नाही. अखेर त्याच्या मनातील भाव डोळ्यातील अश्रूंच्या माध्यमातून बाहेर आले. हा व्हिडीओ शेअर करताना तिने #10yearsoftogetherness हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. आतापर्यंत या व्हिडीओला ९९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर १ मिलियनपेक्षाही जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.

Story img Loader