Wedding viral video: सध्या सर्वत्र लग्न मोठ्या थाटात होताना दिसत आहे. लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद… हाच आनंद साजरा करण्यासाठी लग्न सोहळ्यात मोठ्या उत्साने मंडळी डान्स करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. व्हिडीओमध्ये दीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.
दिराचं लग्न असलं की वहिनीचा मोठा थाट असतो ही गोष्टी काही सांगायची गरज नाही. कारण ते नातंच तसं असतं. या नात्यात मैत्री, प्रेम आणि आदर असतो. त्यामुळे दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळा उत्साह असतो. याशिवाय लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनी मोलाचं योगदान देते. तसेच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते. अशाच एका वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
खरंतर लग्नात एन्ट्रीदरम्यान डान्स करण्याचा ट्रेंड सध्या खूपच व्हायरल होत आहे आणि असंच या महिलेनं केलं, या सुंदर महिलेनं आपल्या दिराच्या लग्नात त्याच्या एन्ट्रीला डान्स केला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नववधू आणि नवरदेव एन्ट्री घेत असतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, लग्न सोहळ्यामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.लग्न सोहळ्यात डान्सचा माहोल तयार झाला आहे. या व्हिडीओतील महिला ‘हम आपके है कोण’ या हिंदी चित्रपटातील ‘लो चली मै अपनी देवर की बारात लेके’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत महिलेचा दीर देखील आपल्या वहिनीसोबत थिरकताना दिसतोय. वहिनींच्या डान्स स्टेप्स पाहून वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या-शिट्ट्या आणि पैशांचा पाऊस पाडलेला दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DIypXzqIhcB/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर हा व्हिडीओ kavitapawarmua नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.