Viral video: सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता देखील सोशल एका लग्नसमारंभातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून सर्वचजण चकित झालेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपात नवरीच्या मागे एक कुत्रा लागला आहे. नवरी पुढे पळतेय आणि कुत्रा तिच्या मागे मागे पळत आहे. नवरीने घागरा घातला असल्याने तिला व्यवस्थित पळता देखील येत नाही. मंडपात पुजेचं सामान ठेवलेलं आहे. त्यातुनच हे दोघे पळत आहेत.

अशात पुजेसाठी ठेवलाल कलश आणि कुरमुऱ्यांचे ताट खाली पडते. मंडपात सगळीकडे हे कुरमुरे आणि तांदुळ पसरले जातात. नवरीला कुत्र्यापासून दूर करण्यासाठी सर्वजण धावपळ करतात. मात्र कुत्रा काही ऐकायला तयार नाही. शेवटी नवरदेव पुढे येतो आणि आपल्या पत्नीला कुत्र्यापासून वाचवतो. त्यानंतर कुत्रा तेथून निघून जातो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जीवापेक्षा मोबाईल महत्वाचा! गाडी चालवताना फोनवर बोलणं पडलं महागात; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

सोशल मीडियावर अनेकदा लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी एखाद्या धक्कादायक क्षणांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding viral video dog attack on bride in wedding ceremony see video srk