Wedding Viral Video : लग्नसराईचे दिवस सुरू झाले असून, त्यासंबंधीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नात तुम्ही पाहिलं असेल की, जेवणासाठी अनेक प्रकारचे हटके आणि चवदार पदार्थ मांडलेले असतात. त्यामुळे लोकांना लग्नापेक्षा जेवणात काय आहे यातच अधिक रुची असते. त्यात जर एखादा आवडीचा पदार्थ असेल, तर पाहुणे मंडळी त्यावर अक्षरश: तुटून पडतात. एकदा खाऊन झाल्यानंतरही पुन्हा-पुन्हा खाण्यासाठी काउंटवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. सध्या लग्नातील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात लग्नात आलेली पाहुणे मंडळी एका डोसा काउंटरवर तुटून पडली आहेत. लग्न समारंभ राहिला बाजूला; पाहुणे मंडळी डोसा खाण्यासाठी एकमेकांना अक्षरश: ढकलून पुढे जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
लग्नात पाहुणे मंडळी डोसा काउंटरवर अक्षरश: तुटून पडले
आपल्या सर्वांना माहीत आहे की, डोसा हा एक असा खाद्यपदार्थ आहे, जो अनेकांना आवडतो. शहरवासीयांसाठी ही डिश काही नवीन नाही; पण खेडोपाड्यांमध्ये त्याची वेगळीच क्रेझ आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. व्हिडीओमध्ये एका लग्नात पाहुणे मंडळी डोसा काउंटरवर अक्षरश: तुटून पडल्याचे दिसतेय. डोसा बनवून तयार होत नाही, तोवर ते तव्यावरूनच उचलून घेऊन निघून जातायत.
पाहुणे मंडळींची ही गर्दी पाहून डोसा बनवणाऱ्याही अक्षरश: फुटला घाम (Wedding Food Loot Video)
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नातील डोसा काउंटरवर डोसा तयार केला जात आहे. त्यावेळी डोसा प्लेटमध्ये घेण्यासाठी पाहुण्यांनी इतकी गर्दी केली आहे की, काही विचारू नका. पाहुणे अक्षरश: हातात प्लेट घेऊन काउंटवरजवळ घोळका करून उभे आहेत. यावेळी तो शेफ डोसा बनवून कट करून प्लेटमध्ये वाढत नाही तोवर लोक तो तव्यावरून उचलून निघून जातायत. तवा गरम आहे आणि त्यामुळे अपघात होऊ शकेल याचाही विचार ते लोक करत नाहीयेत.
ही गर्दी काही कमी व्हायचे नावच घेत नाही, लोक एकमेकांना ढकलत, प्लेटवर प्लेट ठेवून डोसा घेण्यासाठी धडपडत आहेत. डोसा खाण्यासाठी जमलेली ही गर्दी पाहून बनवणाऱ्यालाही अक्षरश: घाम फुटला. डोसाची अशी लूट तुम्हीही यापूर्वी कधी पाहिली नसेल. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.
@ChapraZila नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “आमच्या ऑफिसमध्ये असे वातावरण पाहायला मिळते… जेव्हा कुठलीही पार्टी असते.” तर दुसऱ्याने लिहिले, “एक गोष्ट म्हणजे कोणीही फुकटचा माल सोडू नये. मग तो गावातील असो वा शहरातील.” त्याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.