Wedding dance video: लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका कपलचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुण तरुणीनं अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या तरुणीनं आणि तरुणानं सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.सोशल मीडियावर एक कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल. तो ट्रेडिंगमध्ये असेल याचा काही नेम नाही. गेल्या काही दिवसांपासून या तरुण तरुणीचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या दोघांचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणीनं साडी नेसली आहे तर तरुणानं कुरता घातला आहे. यावेळी ‘देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार…’ या जुन्या गाण्यावर दोघेही डान्स करत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही कौतुक करेल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ the.adityapatil1998 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना या तरुणाचा डान्स खूप आवडला आहे.