Viral Video: स्वतःच्या लग्नाचा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी खूप खास असतो. वधू-वर आपला हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा याची पूरेपूर काळजी घेतात. ज्यात अगदी डान्स, सुंदर लूक, हटके उखाण्यांची ही तयारी आधीपासून करून ठेवतात. सोशल मीडियावर अनेकदा नवरीच्या गमतीशीर उखाण्यांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. पण, आता एका नवऱ्याचा उखाणा खूप व्हायरल होतोय, जो ऐकून तुम्हीही कौतुक कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतीच शिवजयंती पार पडली. अनेक शिवप्रेमींनीही ती मोठ्या उत्साहात साजरीदेखील केली. अनेक ठिकाणी शिवगर्जना म्हणून तर काही ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. पण, आता असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक वर आपल्या पत्नीसाठी प्रत्येक शिवरायांच्या मावळ्याने घ्यावा असा उखाणा घेताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहू शकता, एका लग्नमंडपामध्ये वर आणि वधू बसले असून यावेळी वर उखाणा घेण्यासाठी हातात माईक घेत म्हणतो, “मी आहे मराठा, भगवा माझे रक्त… अंकिताचे नाव घेतो, छत्रपती शिवरायांचा भक्त…” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mr_shutterr या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “जात माझी मराठा, भगवं आहे रक्त…च्या प्रेमात पडला, हा शिवभक्त.” आणखी एकाने लिहिलेय, “छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त” आणखी एकाने लिहिलेय, “खूप छान उखाणा.”