Weight loss video: अनेक जण वर्षानुवर्षे आपलं वजन कमी करण्याच्या मागे लागलेले असतात; पण काही केल्या त्यांच्याकडून वजन कमी होत नाही. डाएट प्लॅन, व्यायाम आणि अनेक गोष्टींमध्ये बदल करूनही त्यांना हवा तो परिणाम मिळत नाही. आणि यालाच कंटाळून ते आशा सोडून देतात. काही केल्या वजन कमी होत नाही म्हटल्यावर त्यांना निराशा येते.

पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तुम्ही तुमचं वजन पाहून कपाळावर हात मारण्याऐवजी खूश व्हाल. या व्हिडीओत एका महिलेने वजन कमी करण्यासाठी एक भन्नाट जुगाड केल्याचे दिसते आहे; जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घेऊ…

हेही वाचा… VIDEO: कोणाचं घर सोडलं नाही ना कोणतं मंदिर, पती-पत्नीने सगळीकडेच मारला डल्ला! पण शेवटी जे झालं ते पाहून कपाळावर माराल हात

महिलेचा जुगाड सगळ्यात भारी

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरेनासं झालं आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक महिला आपलं वजन तपासण्यासाठी वजनयंत्रावर उभी राहिली आहे. स्वत:चं वजन पाहून तिनं अक्षरश: कपाळावर हात मारून घेतला; पण त्यानंतर तिनं जे काही केलं, ते पाहण्यासारखं आहे.

वजन जास्त आहे हे कळताच महिला जमिनीवर झोपली आणि तिनं वरच्या दिशेनं आपले पाय उंचावले. त्या पायांवर महिला वजनयंत्र ठेवून आपलं वजन करू लागली. ते वजन पाहताच महिला आनंदी झाली.

हा व्हिडीओ @old_is_gold.._ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “झटक्यात वजन कमी करण्याची निंजा टेक्निक” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल एक दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… “माझ्या कारचा नंबर घे आणि…”, कारचालकाने दिली धमकी आणि केली शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “आता वजन कमी करा काही सेकंदांत.” दुसऱ्यानं “मीपण असंच करते”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “नशीब आता कळलं की, वजन नेमकं कसं करायचं. इतकी वर्षं मी चुकीची पद्धत वापरत होतो.”

Story img Loader