AI Made Animal Videos Going Viral: लाइटहाऊस जर्नालिझमला प्राण्यांचे व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल होत असल्याचे आढळून आले पण आश्चर्य म्हणजे हे प्राणी नेहमीपेक्षा खूपच वेगळे वाटत होते. पोस्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार या प्राण्यांपैकी (Animal) एक सागरी गाय आहे जी गाय व माशाचं हायब्रीड व्हर्जन आहे. तसेच समुद्रकिनारी आलेल्या वाघाला पाहण्यासाठी आलेल्या गर्दीचा व्हिडीओ सुद्धा या पोस्टमध्ये आहे. आगळ्या वेगळ्या प्राण्यांच्या या प्रजाती खरोखरच पहिल्यांदा दिसून आल्या आहेत का? यात मुळात काही तथ्य आहे का? याविषयीचा आमचा तपास पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर @RoyalRajputUp16 ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Fight between dog and cock people surprise after result dog scared from this bird watch viral video
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” एवढ्याशा कोंबड्यानं कुत्र्याची काय अवस्था केली पाहाच
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

एआय जनरेट केलेल्या वाघाचा आणखी एक व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आम्हाला लक्षात आले.

तपास:

आम्ही प्रथम व्हिडीओचे निरीक्षण करून तपास सुरू केला. गर्दीतील पहिल्या क्लिपमध्ये, एका माणसाला तीन पाय असल्याचे दिसतेय ज्यामुळे हे सिद्ध होते की सदर क्लिप एआय निर्मित आहे.

Weird Animal Spotted
मासा व गायीचं हायब्रीड व्हर्जन (फोटो: सोशल मीडिया)

तपासादरम्यान आम्ही ‘हा प्राणी कोणता आहे?’ असा कीवर्ड सर्च वापरून X वर शोध घेतला. याद्वारे आम्हाला एक पोस्ट सापडली ज्यामध्ये हा व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले होते.

आम्हाला या युजरचे प्रोफाइल तपासताना आम्हाला आढळले की ‘आरोजिनले’ हे वन्यजीव संशोधक आहेत.

आम्ही एआय-निर्मित वाघाचा दुसरा व्हिडीओ देखील तपासला, येथे आम्हाला पुन्हा काही विसंगती आढळल्या. यात एका व्यक्तीचे शूज दुसऱ्याच्या पायात गुंतले असल्याचे दिसत आहेत.

Weird Animal Spotted
मासा व वाघाचं हायब्रीड व्हर्जन (फोटो: सोशल मीडिया)

त्यानंतर आम्ही या व्हिडीओचे स्क्रीनशॉट AI डिटेक्टरद्वारे तपासले. आम्हाला आढळले की गायीचा व्हिडीओ कृत्रिमरित्या बनविला गेला होता.

Weird Animal Spotted
मासा व गायीचं हायब्रीड व्हर्जन (फोटो: सोशल मीडिया)

वाघाचा दुसरा फोटो देखील आम्ही मेबीच्या एआय डिटेक्टरद्वारे तपासला. ज्यात फोटो कृत्रिमरित्या बनवला असल्याचे समजले.

Weird Animal Spotted
मासा व वाघाचं हायब्रीड व्हर्जन (फोटो: सोशल मीडिया)

Fact Check News << Tsunami Video: पुराचा हाहाकार! पाण्याच्या प्रचंड प्रवाहात गाड्यांची अवस्था पाहून विश्वासच बसणार नाही; नेमकं ठिकाण कोणतं?

निष्कर्ष: गाय आणि वाघासारखे दिसणारे पण मुळात अस्तित्त्वात नसलेले प्राणी व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या क्लिप AI वापरून तयार केलेल्या आहेत. व्हायरल व्हिडीओ खोटे आहे.