जुगाड हा आपल्या रोजच्या जीवनातील भाग आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी काही ना काही जुगाड करत असतो. शाळेत असताना कंपास बॉक्स खराब झाला की झाकण बंद राहावे यासाठी आपण रबर बांधायचो…हा जुगाडच तर होता. तुटलेल्या कपाचा दांडा फेव्हस्टिकने चिटकवणे हा देखील जुगाडच असतो. वर्गात बॅट बॉल खेळताना वही किंवा पुस्तकाची बॅट आणि कागदाचा बोळा किंवा खोडरबर म्हणजे बॉल वापरणे हा पण तर जुगाड होता. आपण सर्वच जण काही ना काही जुगाड करत असतो. जुगाड केल्याशिवाय सर्वसामान्यांचे आयुष्य पूर्ण होऊच शकत नाही. सोशल मीडियावर आज काल जुगाड कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, सध्या असाच एक अतरंगी जुगाड चर्चेत आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती बाईक चालवताना दिसत आहे पण जवळ जाऊन पाहिल्यानंतर लक्षात येते की ती बाईक नाही सायकल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बाईकसारखे सीट, हँडल आणि हेडलाईट असलेली सायकल चालवत आहे. एवढंच नाही तर त्याने हेल्मेट देखील घेतले आहे पण तो सायकलसारखे बाईक पँडल मारताना दिसत आहे. बरं हा एकच व्यक्ती नाही ज्यांनी अशी सायकल तयार केली आहे. बाईकसारखी दिसणारी सायकल चालवताना आणखी काही लोक व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा – फक्त दोन शिट्टी द्या अन् कुकरमध्ये कढवा तूप; पाहा तूप बनवण्याची नवी पद्धत, Viral Video

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ rk_khan_facts नावाच्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. लोक व्हिडीओवर भरपूर कमेंट करतात. एकाने कमेंट केली की, “महागाई फार वाढली आहे की पेट्रोलचा खर्च वाचेल” दुसऱ्याने म्हटले की, “आपल्या भारतावर मला गर्व आहे. माझा भारत महान.” तिसऱ्याने सांगितले की, “जुगाड मस्त आहे प्रदुषण मुक्त” चौथ्याने सांगितले, “पेट्रोल बचत”