इंडोनेशियात एका व्यक्तीने त्याच्या प्रेमाला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवलंय आहे. या व्यक्तीने नुकतंच एक लग्न केलंय आणि त्याची सध्या बरीच चर्चा सुरूय. सर्वसाधारणपणे जसे विवाह सोहळे होतात तसाच हाही विवाह सोहळा झाला. यात फरक होता तो केवळ एवढाच की, नवरी कोणी मुलगी नव्हती तर एक प्रेशर कुकर होता. त्याच्या अनोख्या लग्नाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तो नवरदेव तर नवरीप्रमाणेच सजलेल्या प्रेशर कुकरला किस करताना दिसून येतोय. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच त्याने कुकरसोबत घटस्फोट देखील घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रत्येक व्यक्ती आपल्या लग्नाबद्दल विचार करताना एका सुंदर आणि समजदार मुलीसोबत लग्न करून सुखाचा संसार करण्याचा विचार करत असतो. पण इंडोनेशियातल्या खोइरुल अनामने जो लग्नाचा जो निर्णय घेतला त्याने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. कारण त्याने कोणत्या मुलीसोबत नव्हे तर एका प्रेशर कुकरसोबत रितसर लग्न केलंय. त्याच्या लग्नाचे हे व्हायरल फोटो पाहून प्रत्येक जण हैराण होतोय. एका प्रेशर कुकरसोबत लग्न करण्याची का बरं वेळ आली असेल, असा प्रश्न प्रत्येकाला पडताना दिसून येतोय. या व्हायरल फोटोमध्ये खोइरुल अनाम हा नवरदेवाच्या पोशाखात दिसून येतोय. त्याच्या हातात त्याने नवरीप्रमाणे नटलेल्या पांढऱ्या कुकरला पकडलेलं दिसून येतंय. आणखी एका दुसऱ्या फोटोमध्ये तो कुकरसोबत लग्न केल्यानंतर किस करताना दिसून येतोय.

खोइरुल अनामने हा प्रेशर कुकरसोबत रितसर लग्न करून पेपरवर सह्या करून कायदेशीररित्या कुकरला बायको बनवलं आहे. बायको बनवलेल्या कुकरसोबत त्याने वेगवेगळ्या पोज दिलेले फोटोज सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत.

इंडिया टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, खोइरुल अनामने ज्या कुकरसोबत लग्न केलंय, त्या कुकरमध्ये तो गेल्या अनेक दिवसांपासून जेवण बनवत होता. माझी बायको खूप सुंदर आहे, माझी सारं काही ऐकते, काहीच बोलत नाही, शांत असते आणि जेवण बनवून मला खाऊ घालते, असं त्याचं म्हणणं आहे.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुकरसोबत लग्न केल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच त्याने घटस्फोट सुद्धा घेतला. कुकरसोबत घटस्फोट घेण्यामागचं त्याचं कारण ऐकून थक्क व्हाल. कुकरला केवळ भातच करता येतो, दुसरं काहीच करता येत नाही, हे कारण देत त्याने बायको असलेल्या कुकरला घटस्फोट दिलाय. मात्र, कुकरसोबत लग्न करणारा नक्की आहे तरी कोण? असा सवाल प्रत्येक जण विचारत आहेत.

प्रेशर कुकला बायको करणारा इंडोनेशियातला खोइरुल अनाम हा फेमस कंटेन्ट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याची बरीच मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि या फॉलोअर्सचं मनोरंजन करण्यासाठी तो अशा वेगवेगळे विचित्र स्टंट्स करत असतो. फेसबूकवर त्याचं वेरीफाइड अकाउंट आहे. कुकरसोबत केलेल्या लग्नाचे त्याचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. त्याच्या या फोटोला आतपर्यंत १० हजार पेक्षा जास्त लोकांनी शेअर केलं आहे. तर लाखो लोकांनी लाइक करत वेगवेगळे कमेंट्स दिल्या आहेत.