प्रत्येक जोडप्याचे स्वप्न असते त्यांचे लग्न असे झाले पाहिजे की सर्वांच्या कायम लक्षात राहील. सजावटीपासून खाण्यापिण्याची सोय सर्वकाही उत्तम असले पाहिजे. जेणेकरून लग्नात येणारे पाहूणे खूश होती. पण जितका मोठा लग्नसोहळा तितका जास्त खर्च हे गणित ठरलेलंच असते. आजकाल तुमच्या लग्नात तुम्हाला हवी तशी सजावट, जेवण सर्वकाही हॉटेल्, रेस्टॉरंट किंवा इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या उपलब्ध करून देतात, तुम्हाला फक्त पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. कोणताही आर्थिक व्यवहार तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तुम्ही संपूर्ण खर्चाचे पैसे भरता. जर तुम्ही ठरलेले पैसे भरले नाही तर ती फसवणूक ठरू शकते. सध्या इटलीमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर एका वेगळ्याच लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये एका जोडप्याने हे लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती पण पैसे न देताच हे जोडपे फारार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रेस्टॉरंटच्या मालकाने एका जोडप्यावर बिल न भरताच फरार झाल्याचा आरोप लावला आहे. “हे खूप मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर दिवाळखोर होण्याची वेळ आलेली आहे,”असे त्यांनी सांगितले. ४० वर्षीय मोरेन प्रायरेटी (Moreno Priorett) आणि त्याची २५ वर्षीय पत्नी आंड्रें स्वेन्जा (Andrae Svenja) यांनी फ्रोसिनोन प्रांतामधील(Italy’s Frosinone Province) ला रोटोंड सीफूड रेस्टॉरंटमध्ये (Ristorante La Rotonda seafood restaurant)आपल्या पाहूण्यांसाठी रिसेप्शन पार्टी दिली होती.
जोडप्याचे म्हणणे होते की, “त्यांनी ८० लोकांच्या जेवणाचे पूर्ण पैसे दिले होते.” पण, रेस्टॉरंटच्या मालक एंजो फब्रीजी (Enzo Fabrizi) यांनी सांगितले की, “प्रति व्यक्ती ८००० रुपये (७८ डॉलर) या हिशोबाने ८ लाख रुपये (८००० डॉलर) बिल झाले जे जोडप्याने भरले नाही.”
बिल न देता फरार झाले जोडपे
रेस्टॉरंटच्या मालकाने सांगितले की, “बिल न भरताच हे जोडपे फरार झाले. त्यांनी २८०० पाऊंड डिपॉजीट जमा केले होते पण ही रक्कम पार्टी सुरू होण्यापूर्वी जमा केली होती. पण बिल त्यापेक्षा जास्त होते. जेव्ह सर्व पाहुण्यांनी जेवण केले आणि भरपूर दारू प्यायली तेव्हा आम्ही तेथे बिलाचे पैसे मागण्यासाठी गेले. पण बिल न भरताच जोडप्यासह सर्व पाहूणे गायब झाले आहे हे पाहून आम्हाला धक्काच बसला.”
हेही वाचा – चहाप्रेमींनो, सावधान! चहामध्ये असू शकते कच्चे अंड; विचित्र रेसिपी होतेय व्हायरल: पाहा व्हिडीओ
केस मागे घेणार नाही
या घटनेनंतर जर्मन आणि इटली पोलिसांनी जोडप्याला पकडण्यासाठी एकत्र मोहिम राबवली. मिळालेल्या माहितीनुसाह, प्रायरेटी यांच्या मते, “त्यांनी पूर्ण पेमेंट केले आहे.” तर फ्रब्रीजीच्या मते, ” मला असे कोणतेही पैसे मिळालेले नाही. त्यामुळे मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली तक्रार मागे घेणार नाही. जोपर्यंत मला पैसे मिळणार नाही तोपर्यंत केस चालू राहील. मी दिवाळखोरदेखील होऊ शकतात कारण कित्येक लोकांना पैसे द्यायचे आहेत, जे अजूनपर्यंत मी त्यांना दिलेले नाहीत. “