प्रत्येक जोडप्याचे स्वप्न असते त्यांचे लग्न असे झाले पाहिजे की सर्वांच्या कायम लक्षात राहील. सजावटीपासून खाण्यापिण्याची सोय सर्वकाही उत्तम असले पाहिजे. जेणेकरून लग्नात येणारे पाहूणे खूश होती. पण जितका मोठा लग्नसोहळा तितका जास्त खर्च हे गणित ठरलेलंच असते. आजकाल तुमच्या लग्नात तुम्हाला हवी तशी सजावट, जेवण सर्वकाही हॉटेल्, रेस्टॉरंट किंवा इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या उपलब्ध करून देतात, तुम्हाला फक्त पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. कोणताही आर्थिक व्यवहार तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तुम्ही संपूर्ण खर्चाचे पैसे भरता. जर तुम्ही ठरलेले पैसे भरले नाही तर ती फसवणूक ठरू शकते. सध्या इटलीमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर एका वेगळ्याच लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये एका जोडप्याने हे लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती पण पैसे न देताच हे जोडपे फारार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जोडप्याने रेस्टॉरंटमध्ये दिली लग्नाची मोठी रिसेप्शन पार्टी! लाखों रुपयांचे बिल न भरताच नवरा-नवरीने काढला पळ
एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये एका जोडप्याने हे लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती पण पैसे न देताच हे जोडपे फारार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-10-2023 at 13:08 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weird news bride groom fleeing without paying bill of restaurant italy snk