सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करणं यांसारख्या घटना आज खूप सामान्य झाल्या आहेत. आजकाल लोक बिनधास्तपणे आपल्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसमोर खुलेपणाने प्रेम व्यक्त करू लागले आहेत. भारतात सार्वजनिक ठिकाणी मुला-मुलींनी ‘Kiss’ करणं, चुंबन घेणं, मिठी मारणं याकडे समाज नेहमीच वेगळ्या नजरेने पाहतो. दिल्ली मेट्रोमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या अश्लील घटनांबद्दल तुम्ही ऐकले असेल आणि सोशल मीडियावर त्यांच्याशी संबंधित व्हायरल व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. यावरुन बरेच वाद-विवादही झाले, कारवाई झाली.
वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे लोकही चांगलेच संतापले होते. दरम्यान सध्या असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कपलनं सार्वजनिक ठिकाणी पाणी पुरी खाताना किळसवाणं कृत्य केलं आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे कपल पाणीपुरी खात आहे. यावेळी तरुणीनं रिकामी पुरी तोंडात टाकली तर तिच्या बॉयफ्रेंडनं त्याच्या तोंडातलं पाणी तिच्या तोंडात टाकलं. हा व्हिडिओ बघायला इतका किळसवाणा वाटतो की लोकांनी त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.व्हिडिओच्या शेवटी दोघेही हसताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: चक्क मुंबई लोकलमध्ये लागलं लग्न! चालत्या लोकलमध्ये मंगलाष्टका अन् शुभमंगल सावधान…
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @desimojito या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. “पाणीपुरी खायची ही कोणती पद्धत” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईला जनाची नाही मनाचीही लाज उरलेली दिसत नाही आहे. सार्वजनिक ठिकाणी कसलाही विचार, लाज न बाळगता खुल्लम खुल्ला हे कपल अश्लील चाळे करताना दिसतात. ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या आज खुलेआम होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे.