मैत्रीत हसणं खेळणं, मस्करी चालूच असते. आजची तरुणाई मजाक मस्तीशिवाय मैत्रीची कल्पनाही करू शकत नाही. आजच्या तरुणाईसाठी मैत्रीची व्याख्या वेगळी आहे. जेवढी घट्ट मैत्री तेवढा एकमेकांना त्रास अधिक दिला जातो. मित्रांना त्रास देऊन ते स्वत:चं मनोरंजन करत असतात. होळीला मित्राला चिखलात लोळवण्यापासून वाढदिवसाला तोंडाला केक लावत मारहाण करेपर्यंत. असे बरेच प्रकार ही मंडळी करत असतात. मात्र याच मस्करीची कुस्करी झाल्याचीही अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. असंच एक भयानक उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. यामध्ये काही मुलांनी झोपलेल्या मित्रासोबत प्रँक केला आहे. मात्र हा प्रँक तरुणाच्या जीवावर बेतला असता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये काही तरुण आपल्या झोपलेल्या मित्रासोबत मस्ती करताना दिसत आहेत, पण त्यांनी मजा करण्यासाठी निवडलेली गोष्ट धोकादायक आणि प्राणघातक आहे. आता तुम्ही विचार करत असाल की त्यांनी असा कोणता प्रँक केला आहे, ज्यामुळे त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. तर या तरुणांनी झोपलेल्या मित्राला उठवण्यासाठी आगीची मदत घेतली. हो या तरुणांनी चक्क झोपलेल्या मित्राच्या पँटलाच आग लावली. वास्तविक, आपल्या झोपलेल्या मित्राला त्रास देण्यासाठी या तरुणांनी ‘फायर’ची मदत घेतली. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. या तरुणांनी आपल्या मित्राची पॅन्ट पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

Video Shows Best Friends Love
एक अतूट नातं! बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर ‘तिने’ नकळत स्पर्श केला मैत्रिणीच्या पायांना; आजींचा VIDEO एकदा बघाच
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Heartbreaking incident betrayed in love young boy jumps into water in jagdalpur chhattisgarh video
“त्या आईचा तरी विचार करायचा रे” गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; VIDEO पाहून धक्का बसेल
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Shocking video of Thief snatches phone from young girls hand drags her on street Ludhiana video viral on social media
एका चोरीसाठी अक्षरश: तिच्या जीवाशी खेळला! तरुणीच्या हातातून फोन खेचला, तिला रस्त्यावरून फरफटत नेलं अन्…, VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
Little Boy Dressed up as dada Kondke
घाबरलेल्या, वैतागलेल्या चिमुकल्या दादा कोंडकेचा VIDEO मनाला भिडला; हावभाव नाही तर डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फिदा

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुण आरामात आणि गाढ झोपेत असल्याचे दिसून येते. तो गाढ झोपेत असल्याने त्याच्या मित्रांनी काय केले हे त्याला कळले नाही. व्हिडिओमध्ये दोन तरुण या व्यक्तीच्या जवळ आल्याचे तुम्ही पाहू शकता. एकाच्या हातात स्प्रे होता, तर दुसऱ्याच्या हातात पेटलेला कागद होता. तरुणाने स्पेअर करताच त्याच्या पॅन्टने पेट घेतला. त्याच्या पँटला आग लागल्यावर, तरुण धडपडत जागा झाला आणि त्याने त्याची पँट झटकायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला काय झाले ते समजले नाही. पण नंतर त्याला समजले की हे सर्व त्याच्या मित्रांनी केले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तिला मातृत्व मिळालं अन् त्याचा बांध फुटला; १५ वर्षानंतर महिलेनं दिली गोड बातमी, VIDEO पाहून येईल डोळ्यात पाणी

या तरुणांनी मस्करी करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे. मात्र, सोशल मीडियावरील युजर्सनी या तरुणांच्या कृतीवर जोरदार टीका केली आहे. एका यूजरने म्हटले की, ‘झोपलेल्या व्यक्तीसोबत असे कधीही करू नये.’ तर दुसर्‍या युजरने म्हटले की, ‘हा हत्येचा प्रयत्न आहे, तोही व्हिडीओ प्रुफसह’. आणखी एका युजरने म्हटले की, ‘मी असतो तर मी हे कधीच सहन केले नसते.’

Story img Loader