आजकाल बिझी शेड्युलमुळे बहुतांश लोकांना स्वतःसाठी वेळ देता येत नाही. त्याचबरोबर काही लोक असे आहेत जे स्वत:ला फिट ठेवण्यासाठी व्यायाम आणि योगासनांना महत्त्व देताना दिसतात. दरम्यान काही लोकांसाठी हे देखील शक्य नाही, अशा परिस्थितीत बहुतेक लोक शारीरिक आणि मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी बॉडी मसाजची मदत घेतात.बॉडी मसाजचे अनेक प्रकार असतात. अनेकजण बॉडी मसाज महिन्यातून एकदा तरी आवर्जून करुन घेतात. तुम्ही पाहिले असेल, बऱ्याच ठिकाणी लोकांना काही विचित्र पद्धतींसह वेगवेगळ्या प्रकारे बॉडी मसाज दिला जातो. मात्र मसाजच्या नावाखाली जिवंत माणसाच्या अंगाला आग लावल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही ना. मग हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा. या भायनक मसाजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चक्क जिवंत माणसाला लावली आग
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती उलटा पडून आहे आणि त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाची चादर घालण्यात आली आहे. मग मालिश करणारा त्याच्या पायाजवळ आग लावतो आणि ती आग त्याच्या संपूर्ण शरीरावर पसरते. यानंतर मालिश करणारा त्याच्या जळत्या शरीरावर काहीतरी शिंपडतो. मग दुसरी व्यक्ती तिथे येते आणि जळत्या चादरीवर दुसरी चादर ठेवतो, ज्यामुळे आग विझते. हे सगळं पाहून मात्र सगळेच शॉक झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशळ मीडियावर तुफान व्हायरल होत असून असं कुठं मसाज असतं का असा सवाल नेटकरी विचारत आहेत. तर काहीजणांनी यावर संताप व्यक्त केलाय.