आपल्यातील अनेकांचा लाडू हा पदार्थ आवडीचा आहे. एखाद्या शुभप्रसंगी तर खासकरून दिवाळीत बेसनाचे लाडू आवर्जून घरी बनवले जातात. तसेच एखादी व्यक्ती परदेशात किंवा दुसऱ्या ठिकाणी कामानिमित्त किंवा स्थायिक होण्यासाठी जात असेल. तेव्हा आई तिच्या हाताने बनवलेले बेसनाचे लाडू डब्ब्यात भरून आपल्याबरोबर हमखास पाठवते ; असे आपल्यातील अनेक जणांनी अनुभवले असेल. तर आज असाच एक मजेशीर प्रसंग एक डॉक्टर महिलेबरोबर घडला आहे. डॉक्टर महिलेच्या आईने पाठवलेल्या लाडूचे स्वादिष्ट केकमध्ये रूपांतर झाले आहे. नक्की काय घडलं चला पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील अनेक शहरांत मुसळधार पाऊस पडत असला तरीही अनेक ठिकाणी मात्र अजूनही नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तसंच काहीसं दिल्लीचं सुद्धा झालं आहे. दिल्लीतील रहिवाशांसाठी उष्णतेमुळे घराबाहेर जाणे एक आव्हान ठरते आहे. तर यादरम्यान होमिओपॅथी महिला डॉक्टर प्रवास करीत होत्या. तेव्हा डॉक्टरबरोबर एक मजेशीर प्रसंग घडला आहे. महिला डॉक्टरांच्या आईने त्यांच्यासाठी एक बेसनाच्या लाडूंचा डब्बा पाठवला होता. पण, प्रचंड उष्णतेमुळे त्या लाडूचे कशात रूपांतर झाले पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…मेयोनीज आवडीने खाताय? मग विक्रेत्याने VIDEO दाखवलेली ‘ही’ गोष्ट बघा; डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

पोस्ट नक्की बघा…

होमिओपॅथी महिला डॉक्टर दिल्ली एनसीआरचे रहिवासी आहे. व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, डॉक्टर महिलेला प्लास्टिकच्या एका बॉक्समध्ये लाडू पाठवलेले असतात. पण, दिल्लीच्या उष्णतेमुळे हे लाडू वितळून जातात आणि प्लास्टिकच्या बॉक्समध्ये पूर्ण लाडूचे मिश्रण पसरून जाते व त्याचे केकमध्ये रूपांतर होते. तिने कंटेनर उघडताच हा मजेशीर प्रसंग पहिला आणि सगळ्यांबरोबर शेअर करण्याचा ठरवले. कंटेनरचा फोटो काढून लिहिले की, “प्रिय, बेसनचे लाडू.तुमचे दिल्लीच्या उष्णतेत स्वागत आहे!

सोशल मीडियावर ही पोस्ट होमिओपॅथी महिला डॉक्टर यांच्या अधिकृत @thisisbhumika या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. चित्रात खाद्यपदार्थाने भरलेला प्लास्टिकच्या बॉक्स दिसत आहे. “केक” सारखा दिसणाऱ्या पदार्थापूर्वी यात गोलाकार बेसन लाडू होते ; जे अति उष्णतेमुळे वितळले आहेत.ही पोस्ट पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही जण हा अनोखा केक खणायची इच्छा व्यक्त करत आहेत. तर अनेक जण या मजेशीर घटनेवरून दिल्लीच्या उष्णतेचा अंदाज व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcome to delhi besan ladoos sent by homoeopathic doctor women mother melting and turn into cake to the extreme heat must watch asp
Show comments