Drunk Female Police Officer Kiss Video : राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे. चोरी, दरोडा हे गुन्हे रोखण्यासह राज्यात महिलांसाठी सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी देखील पोलिसांवर असते. मात्र पोलीसच जर कायदा सुवस्था मोडत असतील तर? आता तुम्ही काही सेकंद विचार कराल की, पोलीस असे कसे करु शकतात? पण सोशल मीडियावर अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी भररस्त्यात एका महिलेच्या ओठांचे चुंबन घेताना दिसत आहे, हा व्हिडीओ पाहून आता अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ही घटना पश्चिम बंगालमधील सिलीगुरी येथील आहे, ज्यात एक महिला पोलीस अधिकारी पेट्रोलिंग ड्युटीदरम्यान मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) पदावर तैनात असलेल्या तानिया रॉय असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ही महिला पोलीस अधिकारी इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह महिलांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात पिंक पोलिस मोबाइल व्हॅनमधून पेट्रोलिंग करत होती. बुधवारी रात्री पेट्रोलिंगदरम्यान या पिंक व्हॅनने एका व्यक्तीला धडक दिली, त्यानंतर अनेक स्थानिक महिला घटनास्थळी जमा झाल्या. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली.
यावेळी घटनास्थळी उपस्थिती महिलांनी पोलीस अधिकारी तानिया रॉय गाडी चालवत असताना दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला, यानंतर पोलीस अधिकाऱ्याने त्यांनी मद्यप्राशन केले आहे की नाही हे दाखवण्यासाठी एक महिलेला जवळ ओढले आणि चुंबन घेण्याचे लाजिरवाणे कृत्य केले. या घटनेमुळे आता कोलकाता पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असून तिच्या आजूबाजूला अनेक लोकही उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. तिथे पोलिसांची व्हॅन आणि काही पोलीस कर्मचारी देखील आहेत. पोलीस आणि त्या लोकांमध्ये स्थानिक भाषेत संभाषण सुरु आहे. पण हे संभाषण सुरु पोलीस अधिकाऱ्याने त्यांनी मद्यप्राशन केले आहे की नाही हे दाखवण्यासाठी एक महिलेला जवळ ओढले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेतले.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, त्या महिला पोलीस अधिकारीने बाजूला उभ्या असलेल्या महिलेची मान पकडून तिचे चुंबन घेतले, यावेळी उपस्थित लोकांनी तिला रोखले मात्र तिने कोणाचेच ऐकले नाही, या घटनेनंतर लोकांनी गोंधळ घातलाच या पोलीस अधिकारीने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकरी आक्रमक होऊन त्या महिला पोलीस अधिकाऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र, लोकसत्ता डॉट कॉम या व्हिडिओला दुजोरा देत नाही.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक काय म्हणाले?
हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. दरम्यान एक्सवर @TheSquind नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लोकांनी या व्हिडीओवर तीव्र संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे. तसेच ही अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे.
दरम्यान पोलिस विभागाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही, मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची मागणी केली जात आहे.