मुंबईसारख्या शहरात लोकल ट्रेनखाली येऊन दररोज कित्येकांचे जीव जात असतात. कोणी दरवाज्यावर लटकत असताना तोल जाऊन पडतो किंवा कोणी रेल्वे रुळ ओलांडायच्या नादात तर कधी कधी अती घाई एखाद्याच्या जीवाचा खेळ मांडते. असे शेकडोंनी जीव दर महिन्याला रेल्वे अपघातात जात असतात. कधी कधी अशी घटना घडली की मोटरमन प्रसंगावधानता दाखवात त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. आता हेच बघा ना पश्चिम रेल्वेच्या एका मोटारमनने एका कुत्र्याला वाचवण्यासाठी रेल्वेचा वेग अतिशय कमी केला. अशा चांगुलपणा दाखवणा-या मोटारमननाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नाही तर नवल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 VIRAL VIDEO : बुडतानाचे दृश्य चित्रित करण्यासाठी कुत्र्याला दिली अमानुष वागणूक

वाचा : वर्षभर मेहनत करून गावकरी महिलांनी हत्तींसाठी विणले स्वेटर

वेगवेगळ्या फेसबुक पेजवर पश्चिम रेल्वेच्या मोटारमनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वेरुळावरुन कुत्रा चालत होता. कदाचित मागून येणा-या ट्रेनमुळे नेमके कुठे जायचे हे त्याला समजले नाही त्यामुळे तो अधिकच गोंधळला. बरं या कुत्र्याला वाचवण्यासाठी एखाद्याने रेल्वे रुळावर उडी मारली असती तर हे धाडस त्याच्याही जीवावर बेतले असते त्यामुळे कोणी या कुत्र्याची मदत करायला येईना. अखेर मोटारमनने रेल्वेचा वेग अत्यंत कमी ठेवत या कुत्र्याच्या मागून रेल्वे चालवत प्लॅटफॉर्मवर आणली. प्लॅटफॉर्मच्या दुतर्फा उभे असलेले लोक या मोटारमननच्या हुशारीकडे आणि चांगुलपणाकडे कौतुकाने पाहत होते. पश्चिम रेल्वेच्या वसई स्टेशनवरची ही घटना आहे. हा व्हिडिओ गतवर्षातला आहे पण सध्या फेसबुक आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे ट्रेनला जरी प्लॅटफॉर्मवर यायाला उशीर झाला असला तरी यामुळे एका मुक्या जीवाचे प्राण वाचले हे मात्र खरे.

वाचा : १५ लाख बिअरच्या बाटल्यांपासून साकारला बौद्ध मठ