Whale fish video: समुद्रातील जैवविविता आपल्या सगळ्यांनाच थक्क करणारी आहे. विशाल समुद्रात मुंगीच्या आकाराएवढे जीव, तसेच थेट ५० टनांपर्यंतचे देवमासेसुद्धा असतात हे आपल्याला माहीत आहे. देवमासा हा समुद्रातील सर्वांत मोठा मासा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याला पाहण्याची अनेकांना उत्सुकता असते. मात्र, त्या माशापासून आपल्याला धोकाही तितकाच असतो, कारण एका क्षणात तो आपल्याला संपवण्याची, गिळून टाकण्याची ताकद ठेवतो.दरम्यान, सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला समुद्राच्या किनाऱ्यावर एका महाकाय व्हेलला खायला घालताना दिसत आहे. व्हेल मासा बघूनच अनेकांना घाम फुटतो मात्र ही तरुण चक्क त्याला स्पर्श करत आहे. हा व्हिडीओ बघून काही वेळ तुमचाही थरकाप उडेल.
विचार करा हा मासा तुमच्या समोर पाण्याबाहेर आला तर? ऐकूनच भीती वाटली ना… मात्र असा प्रकार प्रत्यक्षात घडलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साहजिकपणे हा व्हिडीओ पाहून लोक चकित झाले आहेत. ज्या व्हेल माशाचं नाव काढलं तरी लोकांना धडकी भरते अशा माशाबरोबर ती महिला गेम खेळते आणि मासेही तिला तितकीच साथ देत असतात. इतकंच नाही तर व्हेलही महिलेची नक्कल करते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला समुद्राच्या किनाऱ्यावर एका काचेच्या भिंतीजवळ उभी असताना एका महाकाय व्हेलला खायला घालत असल्याचे दिसून येते. आहार देताना ती माशांना लहान मुलासारखी वागवते. इतकंच नाही तर तरुणी काहीही करते, व्हेल मासा तिचं त्याच पद्धतीने अनुकरण करते. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत की व्हेल माशांशी माणसाची इतकी घट्ट मैत्री कशी होऊ शकते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> लेक ऑफिसर झाली पण बघायला वडील नाहीत; आठवणीत धायमोकलून रडली, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
हा व्हिडिओ kirakiraorca625 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे. यावर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून, काहीजण टीकाही करीत आहेत. एका युजरने लिहिले आहे – प्राण्याचे किती सौंदर्य आहे, मला हे सर्व अविश्वसनीय वाटते. आणखी एका युजरने लिहिले आहे की, हा धोकादायक प्राणी इतका मैत्रीपूर्ण असू शकतो, असे मला वाटले नव्हते.