विमानातून प्रवास करण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. काही लोकांना विमान प्रवास करायला खूप आवडतं.पण हाच प्रवास जर रोजचा झाला तर, एका ठरावीक वेळे नंतर आपल्यालाही कंटाळा येईल. आपल्यापैकी कुणालाच तेच तेच रुटीन नको असतं. प्रत्येकाला काही ना काही वेगळं करायचं असतं. आपल्याला जर सांगितलं की रोज विमान प्रवास करा, तरी आपण नाही म्हणू , मात्र स्वत: वैमानिकाला असा पर्याय नाही. त्यांना रोज त्यांचं काम हे करावंच लागतं. जसं आपल्याला तेच तेच काम करुन कंटाळा येतो तसाच त्यांनाही येतो. मग एखाद्यावेळी जास्त लांब पल्ल्याचं ठिकाण गाठायचं असेल अशावेळी आकाशात कंटाळा आल्यावर पायलट काय करत असतील असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, चला तर मग जाणून घेऊया. विमान उडवून कंटाळा आलाच तर, पायलट काय करतात.
विमान उडवून कंटाळा आलाच तर…
एक वेळ अशीही येते जिथं ही पायलट, वैमानिक मंडळीही कंटाळतात. बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय विमानप्रवासात अनेक तासांसाठी कॉकपीटमध्ये बसून असतात, त्यांची जबाबदारी पार पाडत असतात. पण, त्यांनाही कंटाळा येतोच. जिथं एक प्रवासी म्हणून आपण एकाच ठिकाणी तासनतास बसून वैतागतो तिथं ही मंडळीसुद्धा अपवाद ठरत नाहीत. प्रवासादरम्यान आपण कंटाळलो की सहसा काहीतरी वाचतो, खिडकीतून बाहेर पाहतच बसतो, मोबाईलमध्ये गेम खेळतो, एखादा चित्रपट किंवा काहीतरी व्हिडीओ पाहतो. मग हे पायलट काय बरं करत असतील? याचं उत्तर अतिशय रंजक आहे.
झोप घेतात –
काही पायलट यावेळी चक्क झोपतात, याचा अर्थ असा नाही की, ते विमान चालवताना झोपतात. ते यावेळी ब्रेक घेतात आणि काही मोठ्या विमानांमध्ये गुप्त झोपण्याच्या क्वार्टर असतात, त्याठिकाणी विश्रांती घेतात.
पायलट प्रँक करतात –
विमान उडवताना मध्येच कंटाळा आला, की ही मंडळी प्रँक करतात. सहसा एका विमानात 2 पायलट असतात. यामध्ये कोणी एक फ्लाईट अटेंडंटसोबत थट्टामस्करी करतात. तर, कोणी सुडोकू खेळांमध्ये रमतात. काही जण याच वेळेचा किंवा कंटाळा आला तर त्याचा सदउपयोग करतात, काही पायलट विमानातच एखादं पुस्तकही वाचतात, गप्पा मारतात. तर, काहीजण चक्क एखादी नवी भाषाही शिकतात. तसेच रेडीओवर बातम्याही ऐकतात.