Viral Video : असं म्हणतात, लहान मुले ही देवाघरची फुले असतात. लहान मुलांचा स्वभाव अत्यंत निरागस आणि प्रेमळ असतो. अनेकदा ते निरागसपणे असे काही बोलून जातात की पोट धरून हसायला येते. सोशल मीडियावर लहान मुलांच्या अनेक गमती जमती व्हायरल होत असतात. ते कधी काय बोलतील सांगता येत नाही. काही वेळा ते असं काही बोलून जातात की आपण हसू आवरू शकत नाही. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली नवरात्रीच्या कार्यक्रमात चक्क तिच्या आईवडीलांविषयी असं काही भन्नाट सांगते की ऐकून तुम्हालाही हसू येईल. (What do mummy and papa call each other with love a little girl funny answer Chhatrapati Sambhaji Nagar video)

“मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?” ( Little Girl’s Funny answer on What Mummy and Papa Call Each Other)

या व्हायरल व्हिडीओ संभाजीनगर येथील एका नवरात्रीच्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये एक अँकर एका चिमुकलीला प्रश्न विचारते त्यावर ही चिमुकली भन्नाट उत्तर देताना दिसून येते.
अँकर – मम्मीचं नाव काय?
चिमुकली – राजश्री
अँकर – पप्पाचं नाव काय?
चिमुकली – गौरव
अँकर – मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?
चिमुकली – मालू आणि बोक्या
अँकर – मालू काय विषय आहे गं?
चिमुकली – चूक भूल द्यावी घ्यावी..

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा

चिमुकलीचे उत्तर ऐकून अँकरसह सर्व जण जोरजोराने हसताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

हेही वाचा : हेच खरे हिरो! १४१ प्रवाशांना विमानात तांत्रिक बिघाडानंतरही सुखरूप खाली उतरवणाऱ्या वैमानिकांवर कौतुकाचा वर्षाव; पाहा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

हेही वाचा : धक्कादायक! मंदिरातून चोरला देवीचा मुकुट; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद, VIDEO होतोय व्हायरल

anchor_akshata_kanhurkarshinde या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यामुळे घरात आपण बायको नवरा जसे वागतात जसे बोलतात तेच मुलं शिकतात त्या मुळे बोलताना मुले समोर असले की नम्र पणे बोला. पुढे चालून हीच पिढी असेच हेच शिकून जाईल.” तर एका युजरने लिहिलेय, “मुले हीं देवा घरची फुले आहेत” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader