पुणे आणि पुणेकर नेहमीच चर्चेत असतात. सध्या एका वेगळ्याच कारणाने पुण्याची चर्चा होत आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ पुण्यातील एफसी रस्त्यावर फिरताना दिसल्याची चर्चा सुरु आहे. नेमके काय आहे प्रकरण जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचे झाले असेल ती पुण्यातील FC रोडवरील एक मजेशीर प्रँक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फिटनेस ट्रेनर सिमरजीत सिंगने प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ असल्याचं भासवून लोकांना चकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही लोक गोंधळल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा प्रँक सिमरजीतने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून व्हिडीओला ३.५ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडीओमध्ये सिमरजीतने चेक्स शर्ट, काळ्या रंगाची पँट, केशरी पगडी आणि सनग्लासेस घातले आहेत. त्याने चेहरा अर्धवट काळ्या रुमालाने झाकला आहे. त्याच्यासह बाउन्सर असल्याने लोकांना खरोखरच तो दिलजीत असल्याचा भास झाला. एकजण त्याला “दिलजीत पाजी, एक फोटो,” अशी विनंती करताना दिसतो.

हेही वाचा –लेकरासाठी काहीपण! मुलाला घेऊन बाईकवर फूड डिलिव्हरी करते ‘ही’ आई, Video Viral

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, “लोकांनी खरंच विश्वास ठेवला की,”तो दिलजीत दोसांझ आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं, “ज्यांनी फोटो काढला, त्यांच्यासाठी वाईट वाटतंय.” काही जणांनी हा प्रँक तीन सेकंदांचा जबरदस्त क्लिकबेट असल्याचं म्हटलं.

हेही वाचा – मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral

दरम्यान, दिलजीत दोसांझ आपल्या ‘दिल-लुमिनाटी’ टूरमुळे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या हैदराबाद कॉन्सर्टदरम्यान, तेलंगणा सरकारने त्यांच्या गाण्यांतील मद्य आणि ड्रग्सच्या उल्लेखांवर आक्षेप घेत नोटीस बजावली. यानंतर दिलजीतने गाण्यांमध्ये बदल करून “दारू च लेमनेड”(ऐवजी “कोक च लेमनेड” ( “daaru ‘ch lemonade” to “Coke ‘ch lemonade,”) असा मजकूर वापरला, ज्यामुळे प्रकरण शांत झाले. व्हायरल क्षणाने कोका-कोलाचे लक्ष वेधून घेतले आणि ब्रँडने एका व्हिडिओला प्रतिसाद दिला आणि“चौथे काम म्हणजे तुमची गाणी म्हणणे, अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What do you say diljit dosanjh seen on fc road in pune video viral know what is the case snk