Optical Illusion: इंटरनेटवर व्हायरल होणारी ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो अनेकदा वापरकर्त्यांना दोन बाजूंनी विभागतात. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो लोक त्यांच्या बुद्धीचा वापर करून उत्तर देतात. असेच आणखी एक फोटो लोकांना खूप विचार करायला लावत आहे. प्रथमदर्शनी लोकांचे उत्तर जवळपास सारखेच आहे, पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळेच उत्तर योग्य असल्याचा दावा केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोटोने लोकांचा उडवला गोंधळ

लोकांना ऑप्टिकल इल्युजनने फोटोंची कोडी सोडवायला मजा येते. मनोरंजक फोटो आपल्याला गोंधळात टाकतात. ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या या फोटोमुळे हॅरी पॉटरचे लेखक जेके रोलिंगचीही रुची वाढवली आहे. त्यांनी हा फोटो तिच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

(हे ही वाचा: ‘या’ आंब्याला मिळालीये चक्क ‘Z+ सुरक्षा’; हा व्हायरल Photo एकदा बघाच)

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक गोंधळले. फोटोवर असं लिहलं आहे की, ‘जर तुम्ही उजव्या विचाराचे असाल, तर तुम्हाला मासा दिसेल. जर तुम्ही डाव्या विचाराचे असाल तर तुम्हाला जलपरी दिसेल.’ काही वापरकर्त्यांनी लिहिले की त्यांनी एक मासा पाहिला. इतरांनी सांगितले की त्यांनी चित्रात जलपरी पाहिली. तथापि, इंटरनेटच्या एका विभागात एकही मासा किंवा जलपरी दिसली नाही, परंतु चित्रात एक गाढव दिसले. हॅरी पॉटर लेखक जेके रोलिंग यांनीही हेच पाहिले. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे गाढव आहे, बहुधा.’

(हे ही वाचा: Video: धक्कादायक! मोठ्या जहाजाखाली आली लहान बोट, सुमारे १०० लोक बेपत्ता)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

(हे ही वाचा: मध्यरात्री धावण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या हिरोने ‘त्या’ तरुणाला दिली मदतीची ऑफर!)

असाच एक फोटो शेअर करताना एका यूजरने त्याला सील म्हटले आहे. त्याचबरोबर काहींनी हा आपला पाळीव प्राणी आहे असं सांगत आहेत. लोक त्यांची मते मांडत आहेत. आता फोटोकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय दिसत आहे?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What do you see in this optical illusion photo ttg