गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना कोण ओळखत नाही. सुंदर पिचाई यांच्या व्यावसायिक कारकिर्दीबद्दल सर्वांनाच माहित आहे पण त्यांचे आवडते खाद्यपदार्थ कोणते हे फारसे कोणाला माहित नाही. एका मुलाखती दरम्यान आपल्या आवडत्या भारतीय खाद्यपदार्थांबाबत पिचाई यांनी खुलासा केला आहे.
सुंदर पिचाई यांना भारतातील त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थाबद्दल विचारले असता, पिचाई यांनी उत्तर दिले, “जर ते बंगलोर असेल तर मला डोसा हवा आहे; ते माझे आवडते अन्न आहे. जर दिल्ली असेल तर मला छोले भटुरे हवे आहे आणि मुंबई असेल तर पावभाजी पाहिजे.”
सुमारे १० मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, सुंदर पिचाई यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भारतावर होणाऱ्या प्रभावासह अनेक विषयांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय अभियंत्यांना उद्योगातील संधी कशा शोधायचे याबाबत सल्लाही दिला. आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘३ इडियट्स’ चा संदर्भ घेऊन सुंदर पिचाई यांनी संकल्पना समजून घेण्याचे महत्त्व सखोलपणे सांगितले.
सुंदर पिचाई यांनी मुलाखतीत सांगितले की, “खरे यश हे सखोलपणे गोष्टी समजून घेतल्याने मिळते.” पिचाई यांनी असेही म्हटले की, अनेक भारतीय विद्यार्थी स्मार्ट असूनही मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात अपयशी ठरतात.
सुंदर पिचाई यांचा जन्म १९७२ मध्ये मदुराई, तामिळनाडू येथे झाला. आणि २०१५ मध्ये त्यांनी IIT खडगपूरमधून मेटलर्जिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली, सुंदर पिचाई यांची Google चे पुढील CEO म्हणून निवड झाली. त्याचे वार्षिक वेतन १८०० कोटी रुपये इतके आहे. २०२२मध्ये त्यांना १८६९ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले होते. हे वेतन भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच मुकेश अंबना याच्या पगारापेक्षा जास्त आहे. म्हणजेच पिचाई दिवसाला ५ कोटी रुपये कमावत आहे. आता वाढत्या एआयच्या मागणीसह ही कंपनी नवी उंची गाठत आहे.
हेही वाचा – भररस्त्यात राडा! दोन गायींमध्ये जुंपली झुंज, पायाखाली तुडवल्या गेल्या मुली……पाहा थरारक Viral Video
Google त्याच्या सर्च इंजिनमध्ये जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स समाविष्ट करण्यासाठी सज्ज आहे, अल्फाबेडच्या मालकीच्या कंपनीने मंगळवारी त्याच्या I/O 2024 इव्हेंटमध्ये जाहीर केले. या व्यतिरिक्त Google ने नवीन जेमिनी आणि जेम्मा मॉडेल्स, अँड्रॉइडसाठी नवीनतम एआय वैशिष्ट्ये देखील लॉन्च करणार आहे.